Marathi actress Pooja Sawant and actor Rishi Manohar car accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Accident: मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतच्या कारचा अपघात

Marathi Actress Accident: ‘कपबशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना पूजा सावंत, ऋषी मनोहर आणि टीमच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

Shruti Vilas Kadam

Marathi Actress Accident: ‘कपबशी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाच्या मोशनसाठी पुण्यावरून सांगलीकडे जात असताना कलाकारांच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कपबशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे हे पुण्याहून सांगलीकडे प्रवास करत होते. सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात त्यांच्या गाडीसह तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या अपघातात गाडीचे नुकसान झाले असले तरी गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. काहींना किरकोळ मुका मार लागला आहे पण कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साम टीव्हीच्या बातमीचा दणका; अन्न व औषध प्रशासनाचे शिर्डीत धाडसत्र

Madhuri Dixit: धकधक गर्लसाठी आईने निवडला होता हा गायक नवरा; पण लग्न झालं डॉ. नेनेंसोबत

Shocking: खेळताना चक्कर आली अन् खाली पडली, १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Latur : सांभाळ करेन म्हणून नातवाच्या नावावर ७.५ एकर जमीन केली, उतार वयात लक्षच देईना; आजीने इंगाच दाखवला

खुशखबर! 50000 विद्यार्थांना मोफट स्कूटी मिळणार, काय आहे राणी लक्ष्मीबाई योजना?

SCROLL FOR NEXT