Marathi Actress Pallavi Joshi Against FIR File Saam Tv
मनोरंजन बातम्या

FIR Against Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविरोधात पोलिसांत गुन्हा; जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

FIR Against Marathi Actress: 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची अभिनेत्री पत्नी पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

FIR Against Marathi Actress: 'द काश्मीर फाइल्स' सारखे वादग्रस्त चित्रपट आणि 'हेट स्टोरी' सारखे बोल्ड चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि मराठमोळी अभिनेत्री निर्माती पल्लवी जोशी कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरुद्ध पश्चिम बंगालमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाने हा गुन्हा दाखल केला आहे. दोघांवरही त्यांचा आगामी चित्रपट 'द बंगाल फाइल्स'मध्ये जातीय द्वेष पसरवला जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये चित्रपटाच्या टीझरचाही उल्लेख आहे.

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचा पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या परदेशात आहेत. अलिकडेच १९ जुलै रोजी त्यांनी न्यू जर्सीमध्ये 'द बंगाल फाइल्स' चा प्रीमियर आयोजित केला होता. आता १० ऑगस्ट रोजी ह्युस्टनमध्ये आणखी एक प्रीमियर कार्यक्रम होणार आहे. पोलिसांकडे दाखल केलेल्या एफआयआरवर विवेक अग्निहोत्री किंवा पल्लवी जोशी दोघांनीही अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.

पूर्वी चित्रपटाचे नाव 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर'

'द बंगाल फाइल्स' चित्रपटाचे नाव आधी 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर' असे होते. परंतु या वर्षी जूनमध्ये निर्मात्यांनी अचानक त्याचे नाव बदलले. नंतर निवेदनात असे म्हटले होते की हे लोकांच्या विशेष मागणीवरून करण्यात आले आहे. चित्रपटाचा टीझर देखील जूनमध्ये प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी त्यात दावा केला आहे की 'द काश्मीर फाइल्स' ने प्रेक्षकांना रडवले असले तरी बंगाल त्यांना घाबरवेल.

'द बंगाल फाइल्स' चे कथानक

विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट त्यांच्या 'द ताश्कंद फाइल्स' ट्रायो मधला तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट १९४६ मध्ये कोलकाता येथे झालेल्या दंगलींवर आधारित आहे. ही घटना १६ ऑगस्ट १९४६ रोजी सुरू झाली, ज्याला ऑल इंडिया मुस्लिम लीगने 'डायरेक्ट अॅक्शन डे' असेही नाव दिले. ब्रिटीशांनी भारत सोडल्यानंतर मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची मागणी करत संप आणि आर्थिक बंदचे आयोजन केले होते. यामुळे कोलकात्तामध्ये जातीय हिंसाचाराचे स्वरूप आले होते. त्यावर हा चित्रपट आधारित आहे.

'द बंगाल फाइल्स'चे कलाकार

विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार, गोविंद नामदेव, बब्बू मान, पलोमी घोष, नमाशी चक्रवर्ती आणि प्रियांशू चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT