Famous Actor Passes Away: मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन नवस हा शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कोची येथील चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. ५२ वर्षीय अभिनेता कलाभवन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पीटीआयच्या माहिती नुसार, कलाभवन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कलाभवन नवस यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा पोलिसांना संशय आहे.
असे सांगितले जात आहे की कलाभवन मल्याळम चित्रपट 'प्रकंबनम' च्या चित्रीकरणासाठी हॉटेलमध्ये थांबला होता. तो शुक्रवारी संध्याकाळी, १ ऑगस्ट रोजी त्याच्या हॉटेलमधून चेक आऊट करणार होता, परंतु जेव्हा तो रिसेप्शनवर गेला नाही तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्याच्या खोलीत गेले तिथे त्यांना अभिनेता बेशुद्धावस्थेत आढळला.
मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टेमनंतर कळेल
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या खोलीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कलाभवन निवासचे पोस्टमॉर्टेम आज शनिवार, २ ऑगस्ट रोजी कलामसेरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात केले जाईल. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल. कलाभवनचा मृतदेह सध्या छोटनीक्कारा येथील एसडी टाटा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाईल.