Neha Pendse Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neha Pendse: प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी ६ लाखांची चोरी, नोकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Actress Neha Pendse : वांद्रे पोलिस ठाण्यात (Bandra Police Station) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नेहा पेंडसेच्या नोकराला अटक केली आहे.

Priya More

Jewellery Stolen Form Neha Pendse Home:

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या (Neha Pendse) घरामध्ये मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. नेहा पेंडसेच्या मुंबई येथील घरातील तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात (Bandra Police Station) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नेहा पेंडसेच्या नोकराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा पेंडसेच्या वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या 23व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. तिच्या घरातील सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. नेहाच्या घरामध्ये चोरी झाल्याची तक्रार तिच्या पतीच्या कारचालकाने पोलिसात दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेहा पेंडसेचे पती शार्दुल सिंग ब्यासचे चालक रत्नेश झा यांनी सांगितले की, शार्दुल झाने 28 डिसेंबर रोजी मला ४ वर्षांपूर्वी लग्नाची भेट म्हणून मिळालेली सोन्याची बांगडी आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी हरवल्याची माहिती दिली. शार्दुलने हे दागिने बाहेर जाताना घातले होते आणि घरी आल्यावर त्याने ते घरातील नोकर सुमित कुमार सोलंकी यांच्याकडे दिले. समितने ते दागिने बेडरूमच्या कपाटात ठेवले होते.

सुमित इतर घरातील नोकरांसह कॉम्प्लेक्समध्येच राहतो. घटनेच्या दिवशी शार्दुल घराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना कपाटातून दागिने गायब असल्याचे त्याला समजले. घरातील सर्व नोकरांची चौकशी करूनही कोणालाच दागिन्यांविषयी काहीच माहिती नव्हती. त्यावेळी नोकर सुमित घरी नव्हता आणि सुमितशी संपर्क साधला असता त्याने कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचा दावा केला. अधिक चौकशी केली असता सुमितने दागिने कपाटात ठेवल्याचे सांगितले.

सुमितशी बोलणं झाल्यानंतर शार्दुलने घरामध्येच शोधाशोध केली पण त्याला दागिने कुठेच सापडले नाही. सुमितवर संशय आल्याने शार्दुलने त्याला ताबडतोब घरी परतण्याची विनंती केली, मात्र सुमितने त्याच्या घरी येण्यास उशीर केला. त्यामुळे शार्दुलचा सुमितवरील संशय आणखी वाढला आहे. त्यानंतर शार्दुलने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने त्याच्या कार चालकाला वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. तक्रारीनंतर पोलिसांनी चोरी प्रकरणी नोकर सुमितविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मात्र चोरीचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT