Ketaki Chitale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?, केतकी चितळेचे वादग्रस्त विधान; VIDEO व्हायरल

Ketaki Chitale On Marathi Language: केतकी चितळेने मराठी- हिंदी भाषेच्या वादामध्ये उडी घेतली. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत 'मराठी भाषेला अभिजात दर्जा हवाच कशाला?', असं म्हटले आहे. यावरून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

Priya More

मराठी-हिंदी भाषेवरून राज्यात सध्या वाद सुरू आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच या वादात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. मराठी भाषेबाबत केतकी चितळेने वादग्रस्त विधान केले आहे. 'मराठी बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार आहेत का?', असा प्रश्न उपस्थित करत केतकी चितळेने वादाला तोंड फोडलं आहे. केतकीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केतकी चितळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे तिने राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठीच्या वादावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. तिने मराठी भाषेला अभिजात दर्जाच्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फरक पडला? महाराष्ट्रात आजही परप्रांतियांना मराठीत बोला, मराठी का येत नाही , अशी विचारणा केली जाते. पण ते मराठी बोलतील किंवा न बोलतील पण त्यामुळे मराठी भाषेला काही नुकसान होणार आहे का? त्याने मराठी भाषेला भोकं पडणार आहे का? असं बोलून तुम्ही स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात.'

तसंच,'मराठी भाषेला अभिजात दर्जा हा क्रायटेरिया २०२४ मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला करायचंच आहे तर सगळ्या भाषांना दर्जा द्या. अभिजात हा संस्कृत शब्द आहे. अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे.', अशी मुक्ताफळं केतकी चितळेने उधळली आहेत.

तसंच, मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरलेल्या ठाकरे बंधूंवर देखील केतकी चितळेने निशाणा साधला. तिने म्हटले की, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नातवंड एका स्कॉटेज मिशनरी क्रिश्चन कॅथलिक स्कूलमध्ये का जातात? त्याठिकाणी पसायद घेतलं जात नाही. त्याठिकाणी त्यांना का टाकले. ते चालते. पण तुम्ही सर्वांना ज्ञान देत फिरता की मराठीमध्ये बोलणं किती अनिर्वाय आहे किती गरजेचे आहे आणि किती महत्वपूर्ण आहे. स्वत:ची पोरं मात्र मिशनरी शाळेत शिकणार.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT