Marathi Get Classical Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला; पण 'अभिजात भाषा' म्हणजे काय?

Marathi Classical Language Status : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. अशात अनेकांच्या मनात याबाबत बरेच प्रश्न निर्माण होतायत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Marathi Classical Language Status
Marathi Get Classical LanguageSaam TV
Published On

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अशात काल केंद्र सरकारने काल लाखो मराठी भाषिक व्यक्तींची ही मागणी पूर्ण केली आहे. मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून ओळखली जाणार आहे. ही बातमी समजल्यानंतर अभिजात भाषा म्हणजे काय? हा दर्जा मिळवण्याचे निकष काय आहेत? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेणार आहोत.

Marathi Classical Language Status
VIDEO: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, लोकसभेत Varsha Gaikwad यांची मोठी मागणी

अभिजात दर्ज म्हणजे नेमकं काय?

दीड ते दोन हजार वर्षे जुनी आणि अद्यापही त्याच भाषेचा उपयोग होत असल्यास या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. देशात आजवर ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. साल २००४ मध्ये तमिळ भाषेला हा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगु तर २०१३ मध्ये मल्याळम तसेच २०१४ मध्ये ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

याचा आपल्याला काय फायदा होणार?

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरकारकडून दरवर्षी २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान मिळते. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यावर याता मराठी भाषेचे स्वतंत्र भवन उभारणे, ग्रंथ आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी काम केले आजे. तसेच देशभरातील विविध विद्यापिठांमध्ये ही भाषा शिकण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते.

अभिजात भाषा होण्यासाठीचे निकष माहितीयेत?

ज्या भाषेकडे २ हजार वर्षे प्राचीन काळापासूनचे ग्रंथ आणि साहित्य असल्याचे पुरावे आहेत त्या भाषांना हा दर्जा मिळतो. प्राचीन काळापासून आतापर्यंतचा या भाषेचा प्रवास अखंडित असावा असंही यात सांगितलं जातं. साहित्य अकादमीकडून या सर्व पुराव्यांची पडताळणी होत असते. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे याची शिफारस केली जाते.

Marathi Classical Language Status
Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com