Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Marathi Language Status update : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
marathi classical language Status : मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Marathi Language Status update Saam tv
Published On

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मोठी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात द र्जा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा दशकांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला जागतिक दर्जा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना आणि शिष्टाईला मोठं यश आलं आहे. मराठी माणसांच्या गेल्या ६ दशकांच्या लढाईला अखेर यश मिळालं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्य सरकारच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्व नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मराठी भाषेसोबत पाली, बंगाली, आसामी भाषेलाही अभिजात दर्जा मिळाला आहे.

marathi classical language Status : मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
PM Modi Maharashtra Visit: PM मोदी महिन्याभरातच पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकणार?

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एका लढ्याला यश आलं. महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचं आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झालं. त्यांचंही मन:पूर्वक आभार'.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, यासाठी अनेकांचे हातभार लागले. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आज तो सुदिन अवतरला आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com