Kanni Movie Pre Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanni Movie: हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा प्री टिझर रिलीज, मैत्री आणि प्रेमाचा अर्थ समजावणार चित्रपट

Hruta Durgule And Ajinkya Raut Movie: समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी'बाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Priya More

Kanni Movie Pre Teaser:

'मन उडू उडू झालंय' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरामध्ये पोहचली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेमध्ये हृता दुर्गुळेसोबत (Hruta Durgule) अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) हा मुख्य भूमिकेत होता. या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता ही जोडी 'कन्नी' चित्रपटाच्या (Kanni Movie) माध्यमातून पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. हृता आणि अजिंक्यच्या कन्नी चित्रपटाचा प्री टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी'बाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत.

कन्नीच्या प्री टिझरमध्ये हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तु्म्हाला कन्नी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर म्हणजेच ८ मार्चला मिळणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तर अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.

दरम्यान, हृता दुर्गुळेने 'अनन्या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हृताने मागच्या वर्षी तिच्या वाढदिवशी म्हणजेच १२ सप्टेंबरला 'कन्नी' चित्रपटाची घोषणा केली होती. हृता आणि अजिंक्य 'मन उडू उडू झालं' या मालिकेनंतर 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उंचच उंच आकाशात उडायचे असेल तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची 'कन्नी' असे म्हणत हृताने 'कन्नी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आता हृता आणि अजिंक्यचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT