कधी कोणी असा विचारही केला नसेल..., Rahat Fateh Ali Khan यांच्या व्हायरल व्हिडीओवर भारतीय गायिकेने व्यक्त केली चिंता

Chinmayi Shripada On Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खान यांनी आपल्या नोकराला चप्पलने बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडीओ आहे. शनिवारपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून राहत फतेह अली खान यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
Chinmayi Shripada On Rahat Fateh Ali Khan
Chinmayi Shripada On Rahat Fateh Ali KhanSaam Tv
Published On

Rahat Fateh Ali Khan Viral Video:

बॉलिवूडसाठी (Bollywood) अनेक सुपरहिट गाणी गाणारे पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे ते चर्चेत आले आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या नोकराला चप्पलने बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडीओ आहे.

शनिवारपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून राहत फतेह अली खान यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तानी गायकाने या कृत्याबद्दल माफी देखील मागितली आहे. तरी देखील त्यांच्यावर टीकेची झोड सुरूच आहे. अशामध्ये आता एका प्रसिद्ध भारतीय गायिकेने राहत फतेह अली खानच्या या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे.

राहत फतेह अली खान यांनी नोकराला केलेल्या मारहाणीवर भारतीय पार्श्वगायिका चिन्मय श्रीपादानेही प्रतिक्रिया दिली आहे. चिन्मय श्रीपादाने तिच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने राहत फतेह अली खान यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आपल्या शिष्याला मारहाण करताना दिसत आहे. यासोबत गायिकेने लिहिले की, 'लोकांसमोर गोड गोड बोलणारी हि लोकं असं काही करू शकतात, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.'

चिन्मयने पुढे लिहिले की, 'आधी फक्त कॅमेरे अस्तित्त्वात असते तर ज्यांना आपण तथाकथित महान मानतो त्यापैकी बहुतेक लोकं खरोखरच काय होते ते इतर लोकांसमोर आले असते.' दुसऱ्या पोस्टमध्ये चिन्मयने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये राहत फतेह अली खान स्पष्टीकरण देत आहेत आणि मारहाण केलेल्यांची माफी मागत आहेत.

दुसरा व्हिडीओ शेअर करत चिन्मय श्रीपादाने लिहिले की, 'येथे उद्देश असा आहे की जेव्हा विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स करतात तेव्हा शिक्षक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात आणि जेव्हा ते कोणतीही चूक करतात तेव्हा शिक्षा तितकीच कठोर दिली जाते. गुरूंना त्यांच्या पदाच्या दिव्यतेपासून सुरक्षा मिळते. मग ते कोणत्याही श्रद्धा/धर्माचे पालन करत असतील. मग त्यांचे सर्व गुन्हे मग ते हिंसाचार, भावनिक छळापासून ते लैंगिक शोषणापर्यंत, त्यांची 'कला', त्यांची 'प्रतिभा' इत्यादींसाठी माफ केले जाते. हे सर्व थांबवण्याची गरज आहे.'

दरम्यान, राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण करताना दिसत आहेत. गायक आपल्या कर्मचाऱ्याला बॉटलबद्दल वारंवार विचारताना दिसत आहे. ते सतत या कर्मचाऱ्याला चप्पलने बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याव जोरदार टीका होत आहे. अशामध्ये राहत फतेह अली खान यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आणि माफीही मागितली.

Chinmayi Shripada On Rahat Fateh Ali Khan
Ketaki Chitale Trolled: 'मी चित्पावन ब्राम्हण...', केतकीनं मराठा आरक्षण सर्वेक्षण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद; नेटकऱ्यांकडून ट्रोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com