Ketaki Chitale On Maratha Reservatio
Ketaki Chitale On Maratha ReservatioSaam Tv

Ketaki Chitale Trolled: 'मी चित्पावन ब्राम्हण...', केतकीनं मराठा आरक्षण सर्वेक्षण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद; नेटकऱ्यांकडून ट्रोल

Ketaki Chitale On Maratha Reservation: मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) घरी देखील मराठा सर्वेक्षणसाठी एक महिला पालिका कर्मचारी गेली होती. या पालिका कर्मचारीसोबत केतकी चितळेने वाद घातला आणि त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला.
Published on

Ketaki Chitale Viral Video:

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा खूपच गाजत आहे. मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil)आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा देखील काढला होता. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी मुंबईकडे येणारा आपला मोर्चा थांबवला. अशामध्ये राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी महापालिका कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) घरी देखील मराठा सर्वेक्षणसाठी एक महिला पालिका कर्मचारी गेली होती. या पालिका कर्मचारीसोबत केतकी चितळेने वाद घातला आणि त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. आता याच व्हिडीओवरून केतकी चितळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे.

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या मराठी मनोरंजनसृष्टीची कॉन्ट्रव्हर्सी क्वीन केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचारीसोबत केतकी चितळेने हुज्जत घालत वादग्रस्त वक्तव्य केले. केतकी चितळेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सर्वेक्षण करणाऱ्यासाठी आलेल्या पालिका कर्मचारीला केतकी चितळे उद्धटपणे प्रश्न विचारत आहे. पण ही पालिका महिला कर्मचारी केतकीला अतिशय नम्रपणे उत्तरं देत आहे. केतकीचे हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही. त्यामुळे ते तिला ट्रोल करू लागले आहेत.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महापालिकेची महिला कर्मचारी जात असते. तिला केतकी चितळे थांबवते आणि विचारते तुम्ही महापालिकेकडून आला आहात ना? तुम्ही सर्वांना त्यांची जात विचारत आहात. आरक्षित की ओपन? यावर ही महिला कर्मचारी हो म्हणून उत्तर देते. त्यानंतर केतकी तिला का? असा देखील सवाल करते. यावर ही कर्मचारी आरक्षणासाठी सर्वेक्षण करत असल्याचे उत्तर देते. त्यावर केतकी म्हणते मराठा आरक्षणासाठी का?, नेमकं कशासाठी ? तुमची जात कोणती? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या कर्मचारीला विचारते.

Ketaki Chitale On Maratha Reservatio
'Lal Salaam'च्या गाण्यासाठी AR Rahman यांनी दिवंगत गायकांना केलं जिवंत, 'थिमिरी येझुदा'साठी AI ची घेतली मदत

या व्हिडीओमध्ये केतकी पुढे म्हणते की, 'तुम्ही मराठा आहेत म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण आहे. धन्यवाद मॅडम. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि हे लोकं आरक्षणासाठी प्रश्न विचारत आहे. महापालिकेकडून ही लोकं येत आहेत. जातीबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशीच हा सर्वे सुरु आहे. संविधान जाती-जातींमध्ये भेदभाव निर्माण करत आहे. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय', असं म्हणत तिने व्हिडीओ थांबवते.

केतकी चितेळेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, 'एवढा जर तुला आरक्षणाबद्दल तिरस्कार वाटतो. तर तू जाती व्यवस्थेचा का विरोध करत नाही. जाती भेदभावामुळे तर आरक्षण आहे ना?' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'जेलची हवा खाऊन आली तरीही सुधरलेली नाही.'

Ketaki Chitale On Maratha Reservatio
Amy Jackson ने बॉयफ्रेंड Ed Westwick सोबत स्वित्झर्लंडमध्ये गुपचूप केला साखरपुडा, एंगेजमेंटचे फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com