'Lal Salaam'च्या गाण्यासाठी AR Rahman यांनी दिवंगत गायकांना केलं जिवंत, 'थिमिरी येझुदा'साठी AI ची घेतली मदत

AR Rahman Song: एआर रहमान नेहमीच काहीना काही तरी क्रिएटिव्ह करत असतात. त्यांनी फक्त गाणी तयार केली नाही तर संगीत वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. एआर रहमान यांनी भारतातील संगीत उद्योगात ऑटो ट्यूनचा ट्रेंड सर्वप्रथम सुरू केला.
AR Rahman On Lal Salaam Movie
AR Rahman On Lal Salaam MovieSaam Tv
Published On

Lal Salaam Movie:

भारताचे सर्वोत्कृष्ट गायक, संगीतकार आणि गीतकार एआर रहमान (AR Rahman) सध्या चर्चेत आले आहेत. एआर रहमान यांनी संगीत इंडस्ट्रीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामासाठी आतापर्यंत त्यांना दोन वेळा ऑस्कर, पद्मभूषण, पद्मश्री, ग्रॅमी अवॉर्ड आणि बाफ्टा अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

एआर रहमान नेहमीच काहीना काही तरी क्रिएटिव्ह करत असतात. त्यांनी फक्त गाणी तयार केली नाही तर संगीत वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. एआर रहमान यांनी भारतातील संगीत उद्योगात ऑटो ट्यूनचा ट्रेंड सर्वप्रथम सुरू केला. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या क्रिएटिव्हिटीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिवंगत गायकांचा आवज पुन्हा जिवंत केला आहे. त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

एआर रहमान यांनी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'लाल सलाम'साठी (Lal Salaam Movie)'थिमिरी येझुदा' हे गाणं तयार केले आहे. हे गाणं त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच एआयच्या (AI) मदतीने तयार केले आहे. एआयचा वापर करून त्यांनी या गाण्यासाठी दिवंगत गायकांना जिवंत केले आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज बंबा बक्या आणि शाहुल हमीद यांचे मंत्रमुग्ध करणारे आवाज एआर रहमान यांनी एआयच्या मदतीने 'लाल सलाम' चित्रपटातील थिमिरी येझुदा या गाण्यासाठी दिले आहेत.

संगीत इंडस्ट्रीत ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या दिवंगत दिग्गज गायकाचा आवाज पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. एआर रहमान यांची ही बातमी समोर आल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांनंतर आता स्वत: एआर रहमान यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याबाबत आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

एआर रहमान यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'एआयचा वापर तोपर्यंत हानिकारक नाही जोपर्यंत त्याचा योग्यपद्धतीने वापर केला जात नाही.' दिवंगत गायकाच्या कुटुंबीयांकडून परवानगी घेऊन आपण हे कृत्य केल्याचेही एआर रहमान यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लहिले की, 'आम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडून परवानगी घेतली आहे आणि त्यांचे व्हॉइस अल्गोरिदम वापरण्यासाठी वाजवी मोबदला पाठवला आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास धोका किंवा उपद्रव होत नाही.'

AR Rahman On Lal Salaam Movie
Shah Rukh Khan: शाहरुख खानला पाहून थरथर कापू लागला चाहता, किंग खानने असं काही केलं की होतंय कौतुक, VIDEO व्हायरल

दरम्यान, भक्कियाराज उर्फ ​​बंबा बक्या हे तमिळ चित्रपटातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार होते. बंबा बक्या यांनी एआर रहमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बंबा बक्या यांनी रजनीकांत यांच्या '2.0' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. पुल्लीनंगल गाऊन ते लोकप्रिय झाले होते. 2022 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. बंबा बक्या यांच्याप्रमाणे शाहुल हमीद देखील तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक होते. ज्यांनी एआर रहमान यांच्यासोबत काम केले आहे. रहमान यांच्यासोबत त्यांनी अनेक टीव्ही जिंगल्समध्ये काम केले होते. 1997 मध्ये कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

AR Rahman On Lal Salaam Movie
Amy Jackson ने बॉयफ्रेंड Ed Westwick सोबत स्वित्झर्लंडमध्ये गुपचूप केला साखरपुडा, एंगेजमेंटचे फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com