Nagpur: परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअपवर
Nagpur Class 12 Paper Leak Saam Tv

Nagpur: परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर

Nagpur Class 12 Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे दोन पेपर फुटले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे पेपर लीक झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.
Published on

Summary -

  • नागपूरमध्ये बारावीचे २ पेपर फुटले

  • फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर लीक झाले

  • सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर संशयास्पद विद्यार्थिनी पकडली गेली

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

पराग ढोबळे, नागपूर

नागपुरमध्ये बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची घटना समोर आली. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आला होता. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आला होता.

Nagpur: परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअपवर
12th HSC Result : धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाले, १७ वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं

सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला. तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला असल्याचे दिसून आले.

Nagpur: परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअपवर
10th-12th Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी, हॉल तिकीटबाबत महत्त्वाची अपडेट समोर

केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थनीची चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती त्यांनी दिली. तर अन्य १३ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Nagpur: परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअपवर
Success Story: 12th फेल, खचले नाही, जिद्दीने क्रॅक केली UPSC; नाशिकचा लेक IPS झाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com