Hemangi Kavi Shared Chhaya Kadam Emotional Post Instagram
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi : “तु कमाल थी, कमाल है और…”, हेमांगी कवीची छाया कदमसाठी भावनिक पोस्ट

Hemangi Kavi Shared Chhaya Kadam Emotional Post : छाया कदमसाठी अभिनेत्री हेमांगी कवीने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तिने छायाच्या कामाचेही विशेष कौतुक केले आहे.

Chetan Bodke

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा फिल्म इंडस्ट्रीतील मानाचा समजला जाणार फिल्म फेस्टिव्हल आहे. या फिल्म फेस्टिव्हलची क्रेझ हॉलिवूडमध्येच नाही बॉलिवूडमध्ये आणि आता मराठी इंडस्ट्रीमध्येही पाहायला मिळत आहे. यावर्षीचा कान्स फेस्टिव्हल मराठमोळी अभिनेत्री छाया कदमसाठी खास ठरला आहे. या फिल्म फेस्टिव्हलमुळे छाया कदमचा जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. छाया कदमसाठी अभिनेत्री हेमांगी कवीने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तिने छायाच्या कामाचेही विशेष कौतुक केले आहे.

हेमांगी कवीने छाया कदमचं कौतुक करताना लिहिले की, "कान्सला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक अचिव्हमेंटसाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. छायडे! तू तिथे जायच्या आधीही भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत झुंड, अंधाधुंद, गंगूबाई काठीयावाडी, आताचा लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस पण तुझं भारीपण आपल्या मराठी मीडियाच्या लक्षात यायला फार उशीर झाला असं मला वाटतं."

"त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं. अक्षरश: डोक्यावर घेतलं! ‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं. लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, तुला बघायला मज्जा येत होती. यानिमित्ताने मला सर्व मीडियाला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली, कुणाबरोबर फिरतेए, काय कपडे घातलेत, मुल का नाही असल्या फालतू आणि लोकांना बोर करणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहीती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हांला सोशल मीडियावर उत्तम एंगेजमेंटही मिळेल. जशी तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत. असो."

"एक असा काळ होता जेव्हा सीरियलवाले तुला शुटिंगसाठी स्वतःचे कपडे आणत जा सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे डिझायनर्स तुला त्यांचे कपडे देऊ करतायेत. क्या बात है... तुझ्या अभिनयाच्या अचिव्हमेंट्स सोबत या अचिव्हमेंटचं कौतुक वाटतंय मला, कारण आपल्याला माहितीये गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं. बाकी तु कमाल थी, कमाल है और कमाल राहा! लव्ह यू..." अशी पोस्ट हेमांगीने शेअर केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT