Janhvi Killekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Killekar: जान्हवी किल्लेकरच्या घरातून मौल्यवान वस्तूंची चोरी; अभिनेत्रीने VIDEO शेअर करत दिली माहिती

Janhvi Killekar House Looted By Thief: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे. जान्हवीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. अचानक झालेल्या चोरीमुळे जान्हवीच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला आहे.

Siddhi Hande

मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे. 'भाग्य दिले तू मला' फेम जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली असून अनेक मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहे. घरात चोरी झाल्याने जान्हवीच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आता त्या रुग्णालयात दाखल आहे.

जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. जान्हवीने सांगितले की, 'माझं पेणमध्ये घर आहे. तिथे आम्ही लहान बंगला बांधला आहे. आम्ही शनिवार-रविवारी येथे जातो. आई-बाबादेखील आमच्यासोबत येतात. आमच्या या घरात नुकतीच चोरी झाली आहे. घरातून स्पिकर्स, गिटार, महागडी घड्याळे, आईच्या महागड्या साड्या सगळकाही चोरीला गेलं आहे. चोरांनी एसीदेखील लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. जर तुमचं घर बंद असेल तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर विशेष काळजी घ्या.

सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आपण आपल्या पैशांनी या गोष्टी विकत घेतो आणि चोर या गोष्टी चोरी करतात. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही फक्त वीकेंडला तिकडे जातो. त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याबाबत काही माहिती नाही. माझ्या आईने या सर्व गोष्टींचा धक्का घेतला आणि तिला अर्धांगवायूचा झटका आला.तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तुम्ही नेहमी घराबाहेर जाताना काळजी घ्या', असं तिने म्हटलं आहे.

जान्हवी किल्लेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी नुकतीच 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम केले होते. त्याचसोबत ती अनेक म्युझिक अल्बममधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT