Marathi Actor Reaction On Loksabha Election Pos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor Reaction On Loksabha Election: कुणीही जिंकलं तरी...'; लोकसभेच्या निकालानंतर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...

Marathi Actor Reaction On Loksabha Election Post: लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. त्याच निकालावर मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात इंडिया आघाडीने आघाडी घेत जास्त जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होताना दिसत आहे. आता या निवडणुकींच्या निकालावर मराठी सेलिब्रिटींनी आपले मत व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यावर हा लोकशाहीचा विजय असल्याचे मराठी कलाकारांनी म्हटले आहे.

लेखक क्षितीज पटवर्धनने निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. आज कुणीही जिंकलं तरीही विजय लोकशाहीचाच झाला, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनेदेखील ही पोस्ट शेअर करत १०० टक्के खरं असल्याचे म्हटलं आहे.

याचसोबत अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने आज आपण काय शिकलो? Berger Paint धुळीला भीतींवर टिकू देत नाही, असं लिहलं आहे.

Tejaswini Pandit Post
Actors Post

तर अभिनेता जयेश चव्हणनेदेखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात आशिष शेलारांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जर महाविकास आघाडी मिळून १८ जागांवर निवडून आली तर मी राजकारण सोडेन. तर त्यावरच जयेश चव्हाणने लिहलं आहे की, आशिष शेलार राजकारण सोडण्याच्या तयारीत.

दिग्दर्शक आशिष बेडेंनेदेखील निवडणुकींच्या निकालावर पोस्ट शेअर केली आहे. खरं तर ते जिंकलेत, हे हरलेत पण हे खुश आहेत आणि ते नाराज, असं त्याने पोस्टवर लिहलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Recruitment: कामाची बातमी! राज्यात १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी भरती; जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार नियुक्ती

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT