Tu Bhetashi Navyane
Tu Bhetashi Navyane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tu Bhetashi Navyane: 'तू भेटशी नव्याने' मालिकेतून सुबोध भावे- शिवानी सोनार ही जोडी पहिल्यांदाच एकत्र; मालिकेचा प्रोमो आऊट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावे नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुबोध भावे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सुबोध भावे 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोध भावेसोबत या मालिकेत शिवानी सोनार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवानी सोनारने याआधी 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत काम केले होते. शिवानी सोनार आणि सुबोध भावे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'तू भेटशी नव्याने' मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या मालिकेतून सुबोध भावेच्या २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा सांगणार आहे. मालिकेत सुबोध भावे कॉलेमधील प्रोफेसरची भूमिका साकारणार आहे. तर शिवानी सोनार विद्यार्थिनीची भूमिका साकारणार आहे.

मालिकेच्या प्रोमोत शिवानी आणि सुबोध भावेची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या प्रोमोत शिवानी २५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. त्यानंतर सुबोध भावेची एन्ट्री होताना दाखवली आहे. सुबोध भावे आणि शिवानी सोनारच्या मालिकेचा नवीन प्रोमो खूपच उत्सुकता वाढवणारा आहे.

'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 'सोनी मराठी' या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. सुबोध भावे बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सुबोध भावेच्या या मालिकेबद्दल चाहत्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना मिळणार कष्टाचं फळ

Horoscope Today : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा जाईल; वाचा आजचं संपूर्ण राशी भविष्य

Hero ने लॉन्च केली नवीन कार्बन फायबर बाईक, फक्त 'हेच' लोक खरेदी करू शकतील

Nikita Dutta: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

SCROLL FOR NEXT