Santosh Juvekar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरला 'कशी' पाहिजे आयुष्याची जोडीदार? स्वतः खुलासा करत म्हणाला, माझं प्रेम...

Santosh Juvekar Talk On Marriage : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सध्या 'छावा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले आहे.

Shreya Maskar

सध्या मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) चांगलाच चर्चेत आहे. तो विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात झळकणार आहे. 'छावा' चित्रपटात 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. त्याची भूमिका पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. आजवर आपल्या दमदार अभिनयाने संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधी देखील त्याने अनेक ऐतिहासिक भूमिका करून चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.

'छावा' चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता संतोष जुवेकरने आता वैयक्तिक आयुष्यावर काही खुलासे केले आहेत. त्याला एका मिडिया मुलाखतीत लग्न, जोडीदार याविषयी प्रश्न करण्यात आले. तेव्हा संतोष जुवेकर काय म्हणाला? जाणून घेऊयात. मुलाखतीत संतोषला विचारण्यात आले की, "तुला जोडीदार कशी पाहिजे?" यावर उत्तर देत संतोष म्हणाला की, "मला चांगल्या स्वभावाची आणि सुंदर दिसणारी जोडीदार हवी आहे. बाकी मला काही नको. जर एखाद्या वेळी भविष्यात मला मुलगी आवडली पण तिला काहीच येत नसेल तर मी तिला नक्कीच समजून घेईन. माझे त्या व्यक्तीवर प्रेम असेल तर मी सर्वकाही ॲडजस्ट करेन. "

पुढे संतोष जुवेकर म्हणाला की, "मला ती व्यक्ती मनापासून आवडली पाहिजे. सध्या माझे लक्ष 'छावा' आणि पुढच्या काही सिनेमांवर केंद्रित आहे. ही वेळ चांगली कायम चांगली राहावी याचा मी विचार करतोय. माझ्या नशीबात असेल ते होईल."

बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. तर चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT