Lata Mangeshkar: 'चाफा बोलेना...' गानकोकीळा लता दीदींची सुपरहिट गाणी ऐकून व्हाल मंत्रमुग्ध

Lata Mangeshkar Death Anniversary : हिंदी असो वा मराठी एकापेक्षा एक गाणी गाऊन लता दीदींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांची गाणी आजही सुपरहिट आहेत.
Lata Mangeshkar Death Anniversary
Lata MangeshkarSAAM TV
Published On

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची गाणी आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. त्यांच्या गाण्यात एक वेगळीच जादू आहे. त्यांना 'गानकोकीळा ' या नावाने ओळखले जाते. लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अशा अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर या प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आहेत. वडिलांकडून त्यांनी गाण्याची शिकवण घेतली.

लता मंगेशकर यांची टॉप १० हिंदी गाणी

  1. ऐ मेरे वतन के लोगो

  2. मेरी आवाज ही पहचान है

  3. ये गलियाँ ये चौबारा

  4. जिंदगी प्यार का गीत है

  5. परदेसी या

  6. अपके सजन सावन मैं

  7. दिल तो पागल हैं

  8. मेरे ख्वाबों मे जो आए

  9. लुका छुपी

  10. तुझे देखा तो ये जाना सनम

लता मंगेशकर यांची टॉप १० मराठी गाणी

  1. मेंदीच्या पानावर

  2. घनश्याम सुंदरा

  3. मी कात टाकली

  4. मी डोलकर दर्याचा राजा

  5. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

  6. चिंब पावसानं रान झालं आबादानी

  7. आज गोकुळात रंग खेळतो हरी

  8. ऐरणीच्या देवा तुला

  9. मोगरा फुलला

  10. चाफा बोलेना

लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. तर त्यांनी 6 फेब्रुवारी 2022ला अखेरचाल श्वास घेतला. लता मंगेशकर यांनी वेगवेगळ्या शैलीतील अनेक गाणी गायली आहेत. त्यांची काही गाणी एकूण आजही डोळे पाण्याने भरून येतात. उदा. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे प्रत्येक वर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला न चुकता अभिमानाने वाजवले जाते. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने विश्वालाच वेड लावलं आहे. लता मंगेशकर यांनी आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. त्यांची मराठी, हिंदी गाणी आजही लोक आवडीने ऐकतात आणि गुणगुणतात. आजही त्यांची मराठी आणि हिंदी गाणी नव्या पिढीच्या तोंडी ऐकायला मिळतात.

Lata Mangeshkar Death Anniversary
HBD Nora Fatehi : फक्त 5 हजार रुपये घेऊन भारतात आलेली नोरा फतेही आज कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा ऐकून डोळे भिरभिरतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com