Santosh Juvekar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar: 'मी तलवारीशीही बोलायचो...'; ट्रोल होणाऱ्या संतोष जुवेकरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Santosh Juvekar new Video: अभिनेता संतोष जुवेकरला सोशल मिडीयावर छावा चित्रपटातील त्याच्या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. अशातच सोशल मिडीयावर त्याच्या मुलाखतीतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Santosh Juvekar: अभिनेता संतोष जुवेकरने सध्या प्रचंड गाजत असलेल्या छावा चित्रपटात रायबा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याच्या अनेक मुलाखती झाल्या. एका मुलाखतीत त्याने अक्षय खन्नाशी सेटवर बोलला नसल्याचे वक्तव्य केले आणि त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आता संतोषचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो प्रशिक्षणादरम्यान तलवारीशी बोलत असल्याचे म्हणत आहे.

या मुलाखतीत संतोष म्हणतो, जे शस्त्र होते जसं की तलवार आणि ढाल आम्ही त्यांच्याशी बोलायचो. प्रशिक्षणासाठी गेल्यावर त्यांना उचलताना आधी त्यांना नमस्कार करायचो आणि त्या तलवारीला सांगायचो आता आपलं प्रशिक्षण सुरू होतंय. उत्तम काम सुरू आहे. अशीच साथ असू दे कायमची... प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्या तलवारीचे आभार मानायचो. तिला सांगायचो उत्तम काम झालं उद्या भेटू लवकरच. जे काही बोलता येईल. कारण तुमचा बॉण्ड पाहिजे ना त्या तालवारीसोबत... मावळे लढले पण त्या तलवारी देखील मावळे होते, म्हणून त्यांचा आदर देखील पाहिजे.

संतोष जुवेकर प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि संगीतकार अवधूत गुप्तेने त्याला समजून घ्या अशा आशयाची पोस्ट फेसबूकवर शेअर केली होती. संतोष हा कोणत्याही कॅरेक्टरमध्ये घुसून काम करणारा नट असल्याचंही गुप्ते म्हणाला होता.

छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यातील कलाकारांच्या भूमिका, बॉक्स ऑफिसची कमाई आदी गोष्टींमुळं चर्चेत आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन अंगावर काटा आणणारा आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT