मराठी रसिकांसाठी एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट मेजवाणीच्या रुपाने येत आहेत. 'झिम्मा २' (Jhimma 2) नंतर हार्दिक जोशीचा (Hardik Joshi) 'क्लब 52' (Club 52) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर अक्षय वाघमारे आणि राकेश बापट यांचा 'खुर्ची' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच 'खुर्ची' या (Khurchi Teaser) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'चर्चा तर होणारच! "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी' या दमदार संवादाने 'खुर्ची' चित्रपटाच्या टीझरला सुरुवात होते. या टीझरने अक्षरशः कायापालट केला आहे. सोशल मीडियावर घोंगावणार हे सत्तेचं वादळ आता थंड होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. सध्या या चित्रपटाच्या टीझरची सगळीकडे चर्चा होत आहे. चित्रपटाचा दमदार टीझर पाहून प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'खुर्ची' चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवेल यांत शंका नाही. टीझरमधील कलाकारांच्या भेदक नजरा चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवत आहे. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार? हे १२ जानेवारीला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.
'खुर्ची' चित्रपटामध्ये अभिनेता राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर आणि श्रेया पासलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. टीझरमध्ये राकेश बापट, अक्षय वाघमार आणि बालकलाकार आर्यन हगवणे या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने अक्षरश: राडाच घातला आहे. त्यांचे लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडले.
संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मिती संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी सांभाळली आहे. राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांनी लिहिले आहेत. तर दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.