'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेतून राणादाच्या भूमिकेत घराघरामध्ये पोहचलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'क्लब 52'मुळे (CLUB 52 Movie) चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हार्दिक जोशी मराठी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्याच्या रुपाने पदार्पण करणार आहे. हार्दिकच्या 'क्लब ५२' या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर, फर्स्ट लूक आणि टीझरनंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'क्लब 52' या चित्रपटाची एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येत आहे. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे. शिवाय संवादही एकदम जबरदस्त आहेत. काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय एकदम उत्तम झाल्याचा दिसत आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. पण त्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या 'क्लब 52' या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या हार्दिकचा खरतनाक लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. त्यातच भाऊ कदम देखील एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन राकेश शिर्के यांनी केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.