Prathamesh Parab SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab : दगडूनं दिल्या थेट थायलंडमधून 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा, बायकोसोबत शेअर केला खास VIDEO

Prathamesh Parab-Kshitija Ghosalkar Video : मराठी अभिनेता प्रथमेश परब याने एका खास अंदाजात 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा दिल्या आहेत. याचा सुंदर व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

आज 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din 2025) मोठ्या अभिमानाने साजरा केला जात आहे. जगाच्या कानकोपऱ्यातून मराठीची साद ऐकू येत आहे. प्रत्येकजण एकमेकांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा देत आहेत. अशाच खूप हटके पद्धतीने मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab ) याने देखील आपल्या प्रेक्षकांना, चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचा खास व्हिडीओ प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची बायको क्षितिजा घोसाळकर सध्या हनिमूनसाठी थायलंडमध्ये आहेत. त्यांनी तिथे 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओच्या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहे. क्षितिजाने (Kshitija Ghosalkar) गुलाबी रंगाची पैठणी नेसली आहे. तर प्रथमेशने गुलाबी कुर्ता परिधान केला आहे.

प्रथमेश परब पोस्ट

"जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या थायलंड मधून हार्दिक शुभेच्छा...

मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा एक अभिमानास्पद भाग आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी मराठी माणसाचं हृदय मात्र नेहमीच मायभूमीकडे ओढ घेत असते.

परदेशात गेल्यावर सुरुवातीला सर्व काही नवीन वाटते. संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि लोकांचे विचार. मात्र, जसे जसे दिवस जातात, तसतसे आपल्या मातृभाषेची ओढ लागते. मराठीची आठवण वेगवेगळ्या गोष्टींमधून सतत येत राहते... परदेशात जर एखादा मराठी माणूस भेटला, तर आनंदाला पारावार उरत नाही. 'तुम्ही कुठून?' एवढं विचारलं तरी गप्पांना सुरूवात होते आणि परदेशातही मराठीपण जिवंत वाटू लागते.

परदेशात वेगळी भाषा वापरण्याची गरज असली तरी मनातल्या मनात मराठीचाच विचार सुरू असतो. एखादं इंग्रजी वाक्य बोलताना मध्येच "अहो, काय सांगू!" "हे लोक काय बोलतात काहीच कळतं नाही!", "बघूया काय होतं" असं सहज सुटतं आणि आपण आपल्या मातृभाषेशी किती घट्ट जोडलेलो आहोत याची जाणीव होते.

परदेशात असलो तरी मराठी भाषेत बोलताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही भाषेत मिळू शकत नाही. म्हणूनच आपण कुठेही असलो तरी आपल्या भाषेवर प्रेम करूया, तिचा आदर करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचं वारसाहक्कानं जतन करूया."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT