Kiran Mane Post Photo With Villagers Instagram @kiranmaneofficial
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: प्रसिद्धीच्या शिखरावर पण पाय जमिनीवर... पारावर बसून किरण मानेंनी व्यक्त केली भविष्याची काळजी

Social Media Post Of Kiran Mane: किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Kiran Mane Post Photo With Villagers: अभिनेते किरण माने सध्या प्रसिद्धी झोतात आहेत. 'बिग बॉस मराठी सीजन ४'ने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेतील वादामुळे जणू त्यांना मराठी सिनेविश्वापासून दूर केले आहे. परंतु त्यांना 'बिग बॉस;मुले एक संधी मिळाली आणि किरण माने यांनी तिचं सोनं केलं.

किरण माने त्यानंतर सतत चर्चांमध्ये येऊ लागले. त्यांच्या प्रत्येक पोस्टची दाखल घेण्यात येऊ लागली. त्यांच्या पोस्ट मधील लेखनाचा, अनुभवाचा आणि किसाचा एक चाहता वर्ग झाला आहे. किरण माने काय पोस्ट करणार, कोणती शिदोरी उघणार याकडे आतानेटकऱ्यांचे लक्ष असते.

किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आजच्या पिढीला जे अनुभवता आले नाही आणि पुढच्या पिढीला हे पाहताच येणार नाही अश्या पारावरच्या गोष्टीचे वर्णन केले आहे. चला पाहूया किरण माने आणि त्यांच्या पोस्ट काय म्हटलं आहे ते.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, '...ह्यो माझा लै आवडता छंद ! गावाकडच्या पारावर बसलेल्या जुन्या खोडास्नी बोलतं करून ऐकत र्‍हायचं. दुनियेभरचं ग्यान मिळतं. गावातले सिसिटीव्ही कॅमेरेच. गांवात कायबी घडूदे. कुठल्याबी घटनेची ग्राऊंड रिॲलिटी हितं पारावर कळते. नादखुळा भन्नाट गप्पांची जी मैफल इथं जमून येते त्यातली मज्जा ऑनलाईन मिटींग आनि चॅटिंगची सवय लागलेल्या आपल्या पिढीला कळनार नाय.

समृद्ध जगण्याला मोबाईलनं न गिळलेली ही शेवटची पिढी ! प्रत्येक गावात अशी मोजकी जुनी खोडं शिल्लक हायत... जाताना जगण्यातलं लाखमोलाचं असं लै कायतरी सोबत घिवून जानारेत... नंतर आपन खर्‍या अर्थानं पोरके आणि कंगाल होनार आहोत !

...इस रास्ते में जब कोई साया न पाएगा,

ये बुढा सा आख़िरी पेड बहुत याद आएगा ! -किरण माने.' (Latest Entertainment News)

'बिग बॉस मराठी' नंतर किरण माने यांच्या प्रगती आलेख उंचावत चालला आहे. इव्हेंट, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये किरण माने दिसू लागले आहे. आगामी रावरंभा चित्रपटामध्ये ते झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT