Irrfan Khan Death Anniversary: तो सोडून गेला तरीही आपल्यात आहे.. जाणून घ्या इरफान बद्दल माहित नसलेल्या गोष्टी

Irrfan Khan Last Movie: इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Irrfan Khan 3rd Anniversary
Irrfan Khan 3rd AnniversarySaam TV

Irrfan Khan 3rd Death Anniversary: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आजच्या दिवशी निधन झाले होते. इरफान खानने मुंबईतील कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात २९ एप्रिल, २०२०ला वयाच्या ५३ व्या उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

इरफान खानला २८ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्यातून निघून गेला. त्याच्या जाण्याने संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला होता.

इरफान खानला मुंबईतील वर्सोवा येथील कब्रस्तानात दफन करण्यात आले. त्याच्या मुलगा बाबिलने त्याच्यावर अंतिम संस्कार केले. इरफान खानच्या निधनाच्या ४ दिवस आधी त्याची आई सईदा बेगम यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते.

Irrfan Khan 3rd Anniversary
The Kashmir Files At Filmfare: फिल्मफेयरमध्ये 'द काश्मीर फाईल्स'ला डावलल्याने अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी

इरफान खानने मार्च, २०१८ला ट्विट करत सांगितले होते की त्याला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर झाला आहे. त्याने त्याच्या आजारावर ब्रिटनमध्ये एक वर्ष उपचार केले आणि तो फेब्रुवारी २०१९ला भारतात परतला होता.

इरफान खान आज या जगात नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' त्याच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी 28 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील इरफानच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव प्रदर्शित होऊ शकला नाही.

या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमधील एका गावात झाले आहे. या चित्रपटात इरफान खानची राजस्थानी शैली पाहायला मिळत आहे. अनूप सिंग यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती सास्किया विशर, जियान शाफ पेलेड आणि मिशेल मर्कट यांनी केली आहे.

'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या चित्रपटात इरफान खान शिवाय वहिदा रहमान, इराणी-फ्रेंच अभिनेत्री गोलसी फतेह फरहानी, शशांक अरोरा आणि तिलोत्तमा शोम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानमधील टोंक येथे पठानी वंशाच्या मुस्लिम कुटुंबात झाला होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ते थिएटर आर्टिस्ट होते. इरफान खानने 1988 मध्ये 'सलाम बॉम्बे!' मधील छोट्याशा भूमिकेतून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. इरफानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आशियाई चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले.

2011 मध्ये इरफानला पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. 2021 मध्ये, त्यांना मरणोत्तर फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इरफान खानने 23 फेब्रुवारी 1995 रोजी सुतापा सिकंदरसोबत लग्न केले. त्यांना बाबील आणि अयान ही दोन मुले आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com