Kiran Mane Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: 'गृहमंत्री महोदय खुर्ची सोडा, राजीनामा द्या', वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या, किरण माने संतापले

Kiran Mane Post On Vasai Incident: मराठी अभिनेते किरण माने नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. काल वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या झाली. याच घटनेवरुन किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.

Siddhi Hande

मराठी अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. किरण माने हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ते नेहमी राजकीय, सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच वसईत घडलेल्या घटनेवर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केले आहे.

१८ जून रोजी वसईत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची भरदिवसा हत्या केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच किरण माने यांनी पोस्ट करत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेअर करत केली आहे. 'वसईमधील तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ पाहून काळीज अगदी पिळवटून गेलं. याआधी तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षनेते होता तेव्हा कोरोनाकाळात सुशांतसिंग राजपूतसाठी घसा खरवडून ओरडत होता. तुमच्या बुडाखाली त्याहूनही भयंकर अपघात रोज घडत आहेत. सोडा खुर्ची. लायक माणसाला बसवा तिथे', असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काल वसईत आरती यादव (२२) या मुलीची प्रियकराने भररस्त्यात हत्या केली. रोहित यादव (२९) असे आरोपीचे नाव आहे. त्या दोघांमध्ये काही कारणांनी वाद झाले होते. याच भांडणाच्या रागतून त्याने आरतीची हत्या केली. रोहितने आरतीला ऑफिसला जाताना अडवलं. त्यानंतर त्यांच्या वाद झाला. यानंतर त्याने लोखंडी पान्याने प्रेयसीवर वार केले. यातच आरतीचा मृत्यू झाला आहे. याआधी आरतीने रोहितविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT