‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद चर्चेत
चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना धमकीचे फोन
दिपाली सय्यद यांनी राजकीय दबावालाही न घाबरण्याची भूमिका स्पष्ट केली
अशोक खरात प्रकरणावर आधारित हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे
Deepali Sayed Threat Calls Over Maharashtra Epstein Files Film मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला असून यात दिपाली सय्यद या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र या चित्रपटामुळे त्यांना धमक्या मिळत आहेत. महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स त्या राजकारणी महिलेची भूमिका साकारणार आहेत. त्यावर त्यांना धमकीचे फोन येत आहेत.
दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येत आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद एका मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान एका मराठी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, “अशोक खरात प्रकरणावर चित्रपट तयार होत असताना कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे चुकीचे आहे. मला काही दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. काही लोक हा चित्रपट करू नका, हा रोल स्वीकारू नका, असे सांगत आहेत. मात्र, मी कलाकार आहे आणि माझे काम प्रामाणिकपणे करणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, काही राजकीय महिला नेत्यांकडूनही आपल्याला फोन आले असून राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. “मी या दबावाला घाबरणार नाही. या सर्व प्रकाराबाबत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपाली सय्यद ( Dipali Sayyad ) यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ ( Deepali Sayed Maharashtra Epstine File Role )या चित्रपटाची स्क्रिप्ट मिळाली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात आल्याचे त्यांनी नमूद केले. “चार महिने मी बिग बॉसमध्ये असल्यामुळे बाहेर काय सुरू आहे, याची माहिती नव्हती. मात्र बाहेर आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती समजली,” असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, मोठ मोठी लोक या सगळ्या खरात प्रकरणामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे अशी प्रकरण थांबली पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक लाईन असते ती आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण किती लोकांवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ठेवली पाहिजे, हे लोकांना कळलं पाहिजे. २ ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे आणि पुढच्या महिन्यात शुटिंग सुरू होईल, त्याच्यामुळे कुठला रोल मी करते हे तुम्हाला कळेलच, असे म्हणत दिपीली सय्यद यांनी चित्रपटातील आपला रोल गुपित ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.