Famous Actor Wedding  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Wedding : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाची तारीख सांगत होणाऱ्या बायकोसोबतचा रोमँटिक फोटो शेअर

Famous Actor Engagement Photo : प्रसिद्ध अभिनेत्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. होणाऱ्या बायकोसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून थेट लग्नाची तारीख सांगितली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

होणाऱ्या बायकोसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बायकोसोबत रोमँटिक फोटो शेअर करून त्याने लग्नाची तारीख जाहीर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हँडसम हंक भूषण प्रधान आहे. भूषण प्रधान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगला चर्चेत असतो.

भूषण प्रधानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये भूषण प्रधान आपल्या होणाऱ्या बायकोसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. दोघांच्याही हातात साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. त्यांनी या पोस्टवर एक तारीख देखील लिहिलं आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिलं की, "२४ जुलै २०२६ ही तारीख लक्षात ठेवा आणि आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा!" यामुळे आता अभिनेता भूषण प्रधान लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये भूषण प्रधानने एका तरुणीला मिठी मारलेली दिसत आहे. फोटोत तरूणीची पाठ दिसतेय, तर भूषणचा चेहरा दिसतोय. या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहे. तसेच अभिनेत्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. कलाकार अभिनंदनाचे मेसेज करत आहेत. आता चाहते फोटोमधली मिस्ट्री गर्ल कोण? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर काहींना ही पोस्ट म्हणजे भूषण प्रधानच्या आगामी चित्रपटाची हिंट वाटत आहे. त्यामुळे भूषण प्रधान खरंच लग्न करणार की, हे नवीन प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा भाग आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

भूषण प्रधान वर्कफ्रंट

भूषण प्रधानने एनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात घरत गणपती, कॉफी आणि बरंच काही, जुनं फर्निचर, टाईमपास, सतरंगी रे, मिस मॅच यासांरख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता चाहते भूषण प्रधानच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT