Anusha-Bhushan : 'Love You...'; भूषण प्रधान अन् अनुषा दांडेकर यांच्यात प्रेम फुललं, 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

Anusha Dandekar Birthday Post For Bhushan Pradhan: मराठी अभिनेत्री अनुषा दांडेकरने भूषण प्रधानच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. ज्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
Anusha Dandekar Birthday Post For Bhushan Pradhan
Anusha-BhushanSAAM TV
Published On

सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर कोणाची हळद तर कोणाचा साखरपुडा आणि केळवण होत आहे. काही तर आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. एकंदर सध्या प्रेमाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आणि अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) ही जोडी कायमच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असते. नुकताच भूषण प्रधानचा वाढदिवस साजरा झाला. त्याचा 25 नोव्हेंबरला वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे आणि त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टमध्ये अनुषाने भूषणसोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

अनुषाने पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने यातून आपल्या भूषणसाठीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हॅप्पी बर्थडे भूषी...आपण नेहमीच ॲडव्हेनचर करतो आणि छान वेळ घालवतो.मला नेहमी हसवण्यासाठी खूप थँक्यू. तू आयुष्यात खूप मोठा हो. तू मनाने खूप सुंदर आणि प्रेमळ आहे. ती प्रत्येकावर प्रेम करतोस आणि त्यात मी देखील येते. लव्ह यू..." असे लिहून आपल्या मनातील भावना तिने व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओतून अनुषाने भूषणवरच्या प्रेमाची कबुली तर नाही ना अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र ट्रीपला गेल्याचे काही क्षण पाहायला मिळत आहेत.

'जुनं फर्निचर' या मराठी चित्रपटात अनुषा आणि भूषणने एकत्र काम केलं आहे. या चित्रपटामुळे त्यांच्यात छान मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही दोघ अनेक कार्यक्रमात एकत्र स्पॉट होतात. तसेच सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. यामुळे ती दोघ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

Anusha Dandekar Birthday Post For Bhushan Pradhan
Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com