Amol Bavdekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amol Bavdekar : "डॉक्टर मी प्रयोग करून येतो, मग माझं ऑपरेशन करा..."; अभिनेता अमोल बावडेकरला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका

Amol Bavdekar Heart Attack : मराठी अभिनेता अमोल बावडेकरला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका आला. ज्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला.

Shreya Maskar

मराठी अभिनेता अमोल बावडेकर (Amol Bavdekar) याने आजवर अनेक मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. अशात आता अमोल बावडेकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अमोल बावडेकरला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका होता. त्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

सध्या रंगभूमीवर 'सुंदर मी होणार' हे नाटक पाहायला मिळत आहे. या नाटकामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत अमोल बावडेकर झळकला आहे. या नाटकाच्या प्रयोगाआधी अमोलला हृदयविकाराचा झटका येतो. त्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. 'सुंदर मी होणार' दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे, जाणून घेऊयात.

राजेश देशपांडे यांची पोस्ट

"रविवारी सकाळी 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. अमोल यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली की, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या. मी प्रयोग करून येतो आणि मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करा." मात्र, डॉक्टरांनी अर्थातच याला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथ नाट्यगृहातील जवळपास हाऊसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी, ते लवकरच 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगांसाठी परत येतील. दरम्यान, बावडेकर यांच्या अनुपस्थितीत नाटकाचे काही प्रयोग अभिनेते अनिरुद्ध जोशी करणार आहेत."

'सुंदर मी होणार' नाटकाचा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. अमोल बावडेकरची प्रकृती बिघडल्यानंतर रविवारचा प्रयोग तात्काळ रद्द करण्यात आला. त्यामुळे निर्मात्यांनी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

Solapur : सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा कधी सुरु होणार? मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT