AIMIMच्या नगरसेविका सहर शेख सध्या चांगल्या ट्रोल होत आहेत.
सहर शेख यांचे 'मुंब्रा को हरा कर देंगे...' हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
सहर शेख यांच्या वक्तव्यावर एका मराठमोळ्या अभिनेत्याने सडेतोड उत्तर दिले आहे.
अलिकडेच महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात मुंब्रा येथून सहर शेख यांचा विजय झाला आहे. त्यानंतर तिने केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. निवडणुकीच्या विजयानंतर भाषण करताना सहर शेख यांनी "कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है" हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व क्षेत्रातून टिका-टिप्पणी करण्यात आल्या. आता यावर एका मराठमोळ्या अभिनेत्याने सडेतोड उत्तर दिले आहे.
सहर शेख यांना आपल्या वक्तव्यानंतर भरपूर ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. त्यानंतर त्यांनी माफीसुद्धा मागितली. मनोरंजन क्षेत्रातूनही कलाकारांनी या वक्तव्यावर टिका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. अशात मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने देखील यावर खोचकपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मराठी अभिनेता अभिजीत केळकर व्हिडीओत सहर शेख यांच्या विधानाची नक्कल करत म्हणतो की, "हरा कर दिया ना... अरे, मी तर बोलतो फक्त मुंब्राच नव्हे, तर पूर्ण हिंदुस्थान हिरवा करून टाका... काय ताई... नाय कळलं...अहो, आमच्यात पण हिरवे करतात...पण ते तसं नाही, असं... झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..." तसेच त्याने व्हिडीओला एक खास कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने लिहिलं की, "फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान, पृथ्वी "हिरवी"गार करून टाका... झाडे लावा झाडे जगवा..."
अभिजीत केळकरच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी कमेंट करत म्हणत आहे की, "छान उत्तर दिलस...", "एकदम बरोबर..." हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.