Famous Actor Wedding : टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर; बायको आहे तरी कोण? पाहा खास क्षणांचे PHOTOS

Famous Marathi TV Actor Marriage : प्रसिद्ध अभिनेता लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहे. बायको कोण, जाणून घेऊयात.
Famous Marathi TV Actor Marriage
Famous Actor WeddingSAAM TV
Published On
Summary

लोकप्रिय मराठी अभिनेता बोहल्यावर चढला.

'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्याला खूप लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाइल प्रपोज केले होते.

लोकप्रिय मराठी अभिनेता बोहल्यावर चढला आहे. नुकतीच त्याने 'ब्युटी क्वीन'सोबत लग्नगाठ बांधली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून 'मुरांबा' फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड आहे. 23 जानेवारी 2026 ला सिद्धार्थ लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हा.रल होत आहे. सिद्धार्थने गर्लफ्रेंड मैथिली भोसेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

गेले काही दिवस सिद्धार्थच्या घरी लगीन घाई पाहायला मिळाली. त्यांचा हळदी, मेहंदी कार्यक्रम खूप थाटामाटात पार पडला. आता लग्न सोहळ्यातही दोघे खूप आनंदी आणि खास दिसत होते. मैथिलीने पिवळ्या-गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. मराठमोठा साज श्रृंगार करून सिद्धार्थची नवरी नटली होती. तर सिद्धार्थने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघेही पारंपरिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते. सध्या या जोडप्यावर कलाकार आणि चाहते प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

सिद्धार्थ-मैथिलीच्या लग्नाला त्यांच्या घरातील जवळचे लोक आणि मित्रमंडळी पाहायला मिळाले. सिद्धार्थ खिरीडने गेल्यावर्षी मैथिलीला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाइल प्रपोज केले होते. त्याचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला. #sidkihuimai हे त्यांचे हॅशटॅगही खूप व्हायरल होत आहे. दोन-तीन वर्षांपासून सिद्धार्थ-मैथिली एकमेकांना ओळखतात.

सिद्धार्थची बायको कोण?

सिद्धार्थ खिरीड डॉ. मैथिली भोसेकरसोबत लग्न बंधनात अडकला आहे. मैथिली ही सौंदर्यवती आहे. मैथिली भोसेकरने 'मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट 2022-2023' हा किताब जिंकला आहे. तसेच पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. ती मॉडेलिंग क्षेत्रातही विशेष सक्रिय आहे. मैथिली भोसेकर ही डेंटिस्ट आहे. मैथिली कॅनडात राहते.

सिद्धार्थ वर्कफ्रंट

अभिनेता सिद्धार्थ खिरीड आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये झळकला आहे. 'मुलगी झाली हो', 'फ्रेशर्स', 'जाऊबाई जोरात', 'हृदयी प्रीत जागते', 'मुरांबा' अशा मालिकांमधून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे. सिद्धार्थचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Famous Marathi TV Actor Marriage
Bigg Boss Marathi 6 : तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी; रुचितानं केली बोलती बंद, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com