Shruti Vilas Kadam
हा सर्वात सोपा आणि पारंपरिक वेणीचा प्रकार आहे. रोजच्या वापरासाठी तसेच शाळा-कॉलेजसाठी ही वेणी अतिशय सोयीची आणि देखणी दिसते.
या वेणीत केस वरून टप्प्याटप्प्याने गुंफले जातात. ही वेणी घट्ट बसते आणि पार्टी, ऑफिस किंवा खास प्रसंगांसाठी योग्य ठरते.फ्रेंच वेणीलाच सागर वेणी असं म्हणतात.
फ्रेंच वेणीसारखीच पण केस खालीच्या बाजूने गुंफली जातात. त्यामुळे वेणी उठून दिसते आणि स्टायलिश लुक मिळतो.
दोन भागांत केस विभागून तयार केली जाणारी ही वेणी नाजूक आणि आकर्षक दिसते. सण-समारंभ किंवा पार्टीसाठी ही वेणी लोकप्रिय आहे.
केसांना दोन भागांत वळवून तयार केली जाणारी वेणी म्हणजे रोप वेणी. ही वेणी पटकन तयार होते आणि मॉडर्न लुक देते.
या वेणीत केसांचे काही भाग मोकळे सोडले जातात, ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहासारखा सुंदर परिणाम दिसतो. खास कार्यक्रमांसाठी ही वेणी योग्य असते.
डोक्याभोवती मुकुटासारखी गुंफलेली वेणी म्हणजे क्राउन वेणी. लग्न, साखरपुडा किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा प्रकार फारच देखणा दिसतो.