Sachin Pilgaonkars Daughter Shriya Saam
मनोरंजन बातम्या

'त्यांना काही काम नसतं, फक्त..' सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेक श्रिया काय म्हणाली?

Sachin Pilgaonkars Daughter Shriya: सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवर मुलगी श्रियाची पहिली प्रतिक्रिया. ट्रोलिंग खेदजनक असलं तरी आता त्याची सवय झाली असल्याचं श्रियाचं मत.

Bhagyashree Kamble

  • सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवर मुलगी श्रियाची पहिली प्रतिक्रिया.

  • ट्रोलिंग खेदजनक असलं तरी आता त्याची सवय झाली असल्याचं श्रियाचं मत.

  • “माझ्या बाबांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं आहे, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही.”

  • श्रिया सध्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये सक्रिय असून चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर ही देखील नामांकित कलाकार आहे. सचिन पिळगावकर यांचे अनेक मुलाखतीचे व्हिडिओ व्हायरल होतात. सचिन बऱ्याचदा आपल्या मुलाखतीतून जूने शूटिंगदरम्यानचे किस्से सांगतात. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवर त्यांची लेक श्रिया हिनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, 'या सगळ्या गोष्टी खेदजनक आहेत. पण आम्हा लोकांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की, आता त्याबद्दल काहीच वाटत नाही. ट्रोलर्सना खरंतर काहीच काम नसतं. म्हणून ते आम्हा कलाकारांना ट्रोल करतात', असं श्रिया म्हणाली.

'शेवटी माझ्या बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळालं आहे. त्यापुढे हे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर कोणत्याही थराला जाऊ शकतात. सोशल मीडियाचं जग असंच असतं. त्यामुळे सोशल मीडियाच्या गोष्टी फार मनावर नाही लावून घ्यायच्या. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं', असंही श्रिया म्हणाली.

आईवडिलांप्रमाणे श्रियाही नामांकित कलाकार बनली आहे. श्रियानं आतापर्यंत चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT