बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Bullet Train Project: डहाणूजवळ ४० मीटर लांबीचा आणि ९७० टन वजनाचा देशातील सर्वात जड गर्डर बसवला. महाराष्ट्रातील १०३ किमी मार्गासाठी तब्बल २५७५ गर्डर बसवले जाणार. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार.
Bullet Train Project
Bullet Train Project Saam
Published On
Summary
  • डहाणूजवळ ४० मीटर लांबीचा आणि ९७० टन वजनाचा देशातील सर्वात जड गर्डर बसवला.

  • महाराष्ट्रातील १०३ किमी मार्गासाठी तब्बल २५७५ गर्डर बसवले जाणार.

  • मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार.

  • २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त.

देशातील पहिला मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता महाराष्ट्रात वेगाने पुढे सरकत आहे. पालघरच्या डहाणूजवळ तब्बल ४० मीटर लांबीचा आणि ९७० मॅट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आला आहे. फुल स्पॅन बॉक्स लॉन्चिंग गेनट्रीच्या सहाय्याने बसवलेला हा गर्डर हा भारतातील सर्वात जड काँक्रीट स्ट्रक्चर मानला जात आहे.

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग आला आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई-अहमदाबादमधील अंतर अवघ्या काही तासांत पार करता येणार आहे. बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळाली असून, डहाणूच्या साखरे गावाजवळ हा गर्डर बसवण्यात आल्याची माहिती आहे.

Bullet Train Project
Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

महाराष्ट्रातील १०३ किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल २५७५ गर्डर बसवले जाणार आहेत. गुजरातमधून येताना बोईसर हे महाराष्ट्रातील पहिलं स्टेशन असणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अवघ्या काही तासांत मुंबई अहमदाबादमधील अंतर अवघ्या काही तासांत गाठता येणार आहे. या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Bullet Train Project
गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

मागील काही वर्षे हा प्रकल्प रखडला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. अशातच आता या प्रकल्पात लागणारा सर्वात जास्त लांबीचा गर्डर ठेवण्यात आल्यानं, या प्रकल्पाची गती अधिक वाढणार आहे. पश्चिम रेल्वेला पर्यायी रेल्वे म्हणून बुलेट ट्रेनकडे पाहिलं जातं. बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Bullet Train Project
आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

सध्या सर्वात लांबीचा गर्डर जरी ठेवला असला तरी, आणखीन जवळपास अडीच हजार गर्डर ठेवण्याचं काम प्रलंबित आहे. २०२६ पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल, अशी माहिती बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com