आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Latest Crime news: हाथरसमध्ये ६ वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली आहे. अवैध संबंध लपवण्यासाठी आईनं पोटच्या लेकीला संपवलं. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh CrimeSaam
Published On
Summary
  • हाथरसमध्ये ६ वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या.

  • अवैध संबंध लपवण्यासाठी आईनं पोटच्या लेकीला संपवलं.

  • नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये ६ वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली आहे. अवैध संबंध लपवण्यासाठी या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी निष्पाप मुलीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीनं आईला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. याच कारणामुळे आईनं पोटच्या लेकीला संपवलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हा धक्कादायक प्रकार सिकंदरराव परिसरातील मऊ चिरायल गावातून उघडकीस आला आहे. आई आणि तिच्या प्रियकरानं मिळून ६ वर्षीय चिमुकलीला संपवलं. नंतर रात्रीच्या वेळेस विहिरीत फेकून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी शर्मा असं आरोपी महिलेचं नाव आहे. घटनेच्या दिवशी पिंकीचे पती आणि सासू मथुरा गेले होते. तर, सासरे गावात फिरायला गेले होते.

Uttar Pradesh Crime
गँगवॉर पेटलं! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खूनाचा बदला; आरोपीच्या मुलालाच संपवलं, पुण्यात थरार

पिंकीचे १७ वर्षीय तरूणासोबत अफेअर सुरू होते. तिनं घरात कुणी नसताना प्रियकराला बोलावून घेतलं. त्यानंतर दोघांनाही मुलीनं एकत्र आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. पिंकीनं मुलीला फटकारले. मुलीनं सांगितलं ही बाब वडिलांना सांगेल. जेव्हा मुलीनं खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनीही तिला पकडले. तसेच गळा दाबून तिची हत्या केली.

Uttar Pradesh Crime
मुंबई पोलिसांकडून गुंडागिरी, साम टिव्हीच्या पत्रकारावर हल्ला, कानशिलात लगावली अन्.. VIDEO समोर

मुलीनं स्वत:च्या बचावासाठी पिंकीचा हात चावला. पण गळा आवळल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी मुलीचा मृतदेह पोत्यात भरला आणि विहिरीत फेकून दिला. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच आरोपी पिंकी आणि तिच्या प्रियकराला अटक केलीआहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Uttar Pradesh Crime
वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com