Prajakta Mali Farmhouse Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात आहे प्राजक्ताचं फार्महाऊस; वीकेंड एन्जॉय करण्यासाठी तुम्हीही जाऊ शकता, वाचा भाडं किती?

Prajakta mali Prajaktkunj Farmhouse: प्राजक्ता माळी ही उत्तम अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळीचे कर्जत येथे 'प्राजक्तकुंज' नावाचे फार्महाऊस आहे. प्राजक्तचे हे फार्महाऊस फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवीगार झाडी असं सौंदर्य पाहायला मिळते. पावसाळ्यात अनेकजण फिरायला जातात. जर तुम्हीही मुंबईजवळ वन डे ट्रीपचा प्लान करत असाल तर तुम्ही मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसला नक्की भेट देऊ शकतात.

प्राजक्ता माळीने गेल्या वर्षी कर्जतमध्ये अलिशान फार्म हाऊस विकत घेतले आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसचे नाव प्राजक्तकुंज असे आहे. या फार्महाऊसच्या मागील बाजूला हिरवेगार डोंगर आहेत. पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाणी आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आमि लिव्हिंग रुम आहे. त्याचसोबत फार्म हाऊसबाहेर बाहेर फॅमिली लंच किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुंदर जागा आहे. याचसोबत मोठा स्विमिंग पुल आहे. या स्विमिंग पुलमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एन्जॉय करु शकता.

प्राजक्ताचे हे फार्महाऊस निसर्गाच्या खुशीत वसलेले आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्राजक्ताच्या फार्महाऊसमधून डोंगरावर कोसळणारे धबधबे दिसतात. त्याचसोबत फार्म हाऊसबाहेर सुंदर गार्डन आहे. हे फार्महाऊस खूपच सुंदर आहे. प्राजक्ताने या फार्म हाऊसच्या परिसरात वेगवेगळी झाडे लावली आहेत. प्राजक्ताचे हे फार्म हाऊस तुम्ही बुक करुन तिथे जाऊन राहू शकता.

मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्तकुंज फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी दिवसाला १५ हजार ते ३० हजार रुपयांना खर्च येतो. याचसोबत इथे खाण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही या फार्म हाऊसला नक्की भेट द्या.

प्राजक्ता माळीबद्दल बोलायचे झाले तर, प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. प्राजक्ता ही उत्तम कवयित्री, व्यावसायिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT