Mahesh Kothare: मला लक्ष्याला घेऊन... महेश कोठारेंनी सांगितलं तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं?

Mahesh Kothare Interview: मराठी चित्रपटसृष्टीतील झपाटलेला हा लोकप्रिय चित्रपट. झपाटलेा चित्रपटातील तात्य विंचू हे पात्र सर्वांनाच आठवत असेल. चित्रपटातील हे पात्र कसं सुचलं याबाबत महेश कोठारे यांनी माहिती दिली आहे.
Mahesh Kothare
Mahesh KothareSaam Tv

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे झपाटलेला. झपाटलेला चित्रपटावर आजही प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. झपाटलेला चित्रपटातील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजे तात्या विंचू. चित्रपटात तात्या विंचू ही बोलणारा बाहुला असतो. भीतीदायक आणि कॉमेडी असा हा चित्रपट होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप वेड लावले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. या चित्रपटाची आयडिया कशी सुचली, याबाबत महेश कोठारे यांनी सांगितलं आहे.

महेश कोठारे यांनी नुकतीच लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी तात्या विंचू हे पात्र साकार करण्याची कल्पना कशी सुचली याबाबत माहिती दिली आहे. महेश कोठारे यांनी सांगितले की, 'एक स्क्रिप्ट तयार करुन त्यात लक्ष्मीकांत बेर्डेला छान पात्र द्यायचं असं डोक्यात होतं. त्यावेळीच अचानक तात्या विंचू साकारायची कल्पना अचानक सुचली. रामदास पाध्ये हा माझा जुना मित्र. रामदासच्या वडिलांची आणि माझी ओळख होती'.

'एकदा एका कार्यक्रमात रामदास पाध्येने मला अर्धवटरावाच्या हातातून हार घातला. त्यानंतर मग तात्या विंचूची कल्पना सुचली. अर्धवटराव हा स्वतः बोलत नाही. रामदास त्याच्यामागून आवाज काढते. हे त्याचे खूप चांगले कौशल्य आहे. त्यावेळी ही कल्पना सूचली की, जर खरंच बाहुला बोलायला लागला तर... त्यानंतर आम्ही चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला', असं त्यांनी सांगितले.

Mahesh Kothare
Trupti Dimri: नॅशनल क्रश तृप्ती डिमरी आता रणबीर कपूरची शेजारीण, मुंबईतील अलिशान घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री खूपच खास होती. महेश कोठारे त्यांच्या नवीन चित्रपटात एआयच्या मदतीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज चित्रपटात देणार आहेत.

Mahesh Kothare
HBD Sonam Kapoor: अनिल कपूरची लेक, तरीही सोनम कपूरने केलं वेटरचं काम; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com