Manoj Bajpayee  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

Manoj Bajpayee Viral Video : बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ते पापाराझींवर भडकताना दिसत आहेत.

Shreya Maskar

मनोज बाजपेयी हे आपल्या दमदार वेब सीरिजसाठी ओळखले जातात.

सध्या मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत मनोज बाजपेयी पापाराझींवर भडकताना दिसत आहेत.

प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलिकडेच त्यांचा जुगनुमा (jugnuma) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर भडकताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांना पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केले. तेव्हा त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझी पुढे आले. तेव्हा मनोज बाजपेयी चिडून म्हणतात की, "पागल है क्या? फोटो खिंचवाने थोडी आये है..." असे बोलून त्यांनी कॅमेरा बंद करण्याचा इशारा केला. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पांढऱ्या रंगाच्या शर्ट-पॅन्टमध्ये मनोज बाजपेयी एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांच्या शर्टवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळाली. डोळ्याला काळा गॉगल लावून डॅशिंग लूकमध्ये ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. कलाकारांचे पापाराझींवर चिडताना, भडकतानाचे व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. कधी कधी कलाकारांचा संयम तुटतो तेव्हा ते असे रिएक्ट करून जातात.

मनोज बाजपेयी यांनी आजवर अनेक हिट चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत. 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मनोज बाजपेयी आता लवकरच पुन्हा एकदा 'फॅमिली मॅन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT