Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO
'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान फरहाना भट्टची शाळा घेतो.
सलमान फरहानाला नीट वागण्याची ताकीद देतो.
'वीकेंड का वार'ला मिका सिंग येणार आहे.
'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19) घरात च्या घरात यंदा 'वीकेंड का वार' चांगलाच गाजत आहे. या आठवड्यात घरातून बाहेर कोण जाणार याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने काही सदस्यांची चांगला क्लास घेतला आहे. तो निलमला तान्या मित्तलसोबतच्या मैत्रीवरून देखील बोलतो. तर फरहाना शेवटची वॉर्निंग देतो. सलमान खान फरहानाला नेमकं काय बोलतो, जाणून घेऊयात.
फरहाना भट्ट निलमला एकदा'नाचने वाली' असे म्हटले होते. यावरून सलमान खानने फरहानाला चांगले फटकारले. सलमान खान फरहानाला बोलला की, "फरहानामध्ये सर्वात मोठं टॅलेंट आहे की लोकांना Provoke करणे. नाचनेवाली हे जे तू बोली आहेस...फरहाना खान लाइन मत क्रॉस करना..." असे बोलून तिला ताकीद देतो.
आता रविवारी 'वीकेंड का वार' मध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात बसीर अली, नेहल, प्रणित मोरे आणि गौरव खन्ना यांचा समावेश आहे. 'बिग बॉस 19' चे अपडेट देणारे अनेक सोशल मिडिया अकाउंट आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात 'बिग बॉस 19' च्या घरातून बसीर अली आणि नेहल बाहेर जाणार आहे. नेहलला सर्वात कमी मते मिळाली आहेत.
'बिग बॉस 19'मध्ये 'वीकेंड का वार' ला मिका सिंग येणार आहे. घरात धमाल-मस्ती पाहायला मिळणार आहे. मिका सिंग आपल्या सुरेल आवाजाने 'वीकेंड का वार'ला चारचाँद लावतो. घरातील सदस्य देखील त्यांच्या गाण्यावर नाचताना दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
