Mamta Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mamta Kulkarni : ममताचा संन्यास, आखाड्यांचा संताप, श्री यमाई ममता नंदगिरीवरून वाद टोकाला; पाहा स्पेशल रिपोर्ट

Mamta Kulkarni News : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं घेतलेल्या संन्यासावरून वाद का विकोपाला गेलाय. किन्नर आखाड्यातील तिच्या दीक्षेवर कुणी आक्षेप घेतलाय? ममताला संन्यास सोडावा लागणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

Mamta Kulkarni : जगात काही लोक अशी असतात की वादाचं आणि त्यांचं नातं आयुष्यभराचं असतं. त्यातलीच एक एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी ममता कुलकर्णी. ममताचं आतापर्यंतचं आयुष्य वादांनी भरलेलं होतं. मात्र या साऱ्या वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं संन्यासी होण्याचा निर्णय़ घेतला आणि महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्या तिनं साध्वी होण्यासाठी दीक्षा घेतली. काम, क्रोध, राग आणि लोभापासून मुक्ती मिळवण्यासाठी कुलकर्ण्यांची ममता श्री यमाई ममता नंदगिरी झाली आणि त्यावरूनच वाद विकोपाला गेला. ममताला किन्नर आखाड्याच्या थेट महामंडलेश्वराच्या पदावर बसवण्यात आलंय आणि त्यामुळेच किन्नर आखाड्याची पहिली महामंडलेश्वर हेमांगी सखीसह अनेक साधू-संतांनी तिच्या दीक्षेवर आक्षेप घेतलाय.

ममताचा संन्यास कशामुळे वादात?

- ममतानं धर्मशास्त्राची कोणतीही शिक्षा न घेता दीक्षा घेतली

- स्त्री असूनही किन्नर आखाड्यात दीक्षा देण्यावर आक्षेप

- कोणतीही धार्मिक प्रक्रिया पूर्ण न करता थेट महामंडलेश्वर पदावर कशी?

- ड्रग्ज आणि दाऊदशी नाव जोडले गेलेल्या वादग्रस्त ममताला एवढं मोठं पद का दिलं?

असे अनेक प्रश्न ममतानं घेतलेल्या सन्यासावर उपस्थित करण्यात आले आहेत.

बॉलिवूडमध्ये असताना ममता कुलकर्णी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात होती. तिनं अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. नंतर तिच नाव थेट एका ड्रग्ज रॅकेटशी जोडलं गेलं आणि पुन्हा चर्चेत आली होती. मात्र मधल्या दशकभरात ममता पूर्णपणे गायब होती. एकेकाळी तोकड्या कपड्य़ांमध्ये डान्स करून चाहत्यांना घायाळ करणारी ममता दीर्घकाळानंतर अवतरली ती थेट भगव्या वस्त्रांमधली श्री यमाई ममता नंदगिरी म्हणून. त्यागाची भावना घेऊन वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं सन्यास घेतला खरा. मात्र वाद काही तिचा त्याग करायला तयारी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरधाव वेगाने घात केला! भीषण अपघतात ७ जणांचा होरपळून मृत्यू

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT