Padma Award 2025: महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट; अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma Awards 2025 Announcement : भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
Padma Award
Padma Awards 2025 AnnouncementZee5
Published On

Padma Awards 2025 Announcement : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय.

या यादीत देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. यंदा पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची निवड करण्यात आलीय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजित सिंगलाही सन्मानित करण्यात आले आहे. संगीतातील योगदानाबद्दल अरिजित सिंग यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. अरिजित सिंग हे आज खूप लोकप्रिय नाव आहे आणि त्याचे खूप चाहते आहेत.

पद्मश्री पुरस्कार मिळालेले कलाकार

अनंत नाग

जतीन गास्वामी

नंदमुरी बाळकृष्ण

दिवंगत गायक पंकज उधास

अजित कुमार

शेखर कपूर

शोभना चंद्रकुमार

अद्वैता गडानायक

अच्युत पालव

अश्विनी देशपांडे

बॅरी जॉन

बेगम बतूल

भरत गुप्त

भेरू चौहान

त्याचबरोबर इतर हरहुन्नरी कलाकारांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय.

२०२५ महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण

मनोहर जोशी (मरणोत्तर)

पंकज उधास (मरणोत्तर)

शेखर कपूर

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व्यक्तीमत्व

अच्युत पालव - कला

अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग

अशोक सराफ – कला

अश्विनी भिडे देशपांडे – कला

चैतराम पवार – सामाजिक कार्य

जसपिंदर नरुला – कला

मारुती चितमपल्ली – साहित्य

रानेंद्र भानू मुजुमदार – कला

सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी

वासुदेव कामत – कला

विलास डांगरे - वैद्यकीय

Padma Award
Republic Day 2025: २६ जानेवारीला नक्की पहावे 'हे' टॉप १० देशभक्तीपर चित्रपट

बिहारची स्वर कोकिळा ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत गायिका शारदा सिन्हा यांनाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. शारदा सिन्हा यांना मरणोपरांत पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शारदा सिन्हा यांचा मृत्यू छठ पूजेच्याआधी झाला होता. शारदा तिच्या छठ गाण्यांसाठी खूप लोकप्रिय होती. अशा स्थितीत त्याच दिवशी त्यांचे निधन झाल्याने जनतेला मोठे दुःख झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com