मराठी मनोरंजनसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'मुळशी पॅर्टन' या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि मनोरंजनविश्वातील मंडळींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मालविका गायकवाडने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. लंडनमधील सुंदर ठिकाणी काढलेल्या या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येतो. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिचा पती सिद्धार्थ संघवीदेखील तिच्यासोबत दिसत आहे.या फोटोंना तिने 'एक वर्षानंतर तीच जागा, तोच ड्रेस आणि अजून थोडं प्रेम' असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तिच्या या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची झलक दाखवली आहे.
मालविका गायकवाडला खरी लोकप्रियता मिळाली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'मुळशी पॅर्टन या चित्रपटातून. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने अभिनेता ओम भूतकरच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केले. सध्या अभिनेत्री मनोरंजनविश्वापासून दूर असून आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मालविका गायकवाडने २०२० मध्ये सिद्धार्थ संघवी यांच्याशी पारंपरिक पद्धतीने विवाह केला. आता लग्नाच्या जवळपास सहा वर्षांनंतर तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमबीएचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती लंडनमध्ये स्थायिक असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.