Filmmaker Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Filmmaker Death : तेजस्वी तारा हरपला! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Filmmaker Passes Away : मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ फिल्म मेकर यांचे निधन झाले आहे. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. फिल्म मेकरच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध फिल्म मेकरचे निधन

वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आर. सरथ (R Sarath) यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. फिल्म मेकरच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. आर. सरथ हे सिनेविश्वातील मोठे नाव आहे.

mathrubhumi च्या वृत्तानुसार, आर. सरथ यांनी तिरुवनंतपुरममधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आर. सरथ यांच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या श्रद्धांजली वाहिली आहे. आर. सरथ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रशंसनीय मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'सायान्हम' (Sayahnam), 'शीलाबती' (Sheelabathi), 'स्थिती' (Sthithi) आणि 'बुद्धन चिरिक्कुन्नु' (Buddhan Chirikkunnu) हे त्यांचे गाजलेले चित्रपट होय. यापैकी 'सायान्हम' या चित्रपटाला समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आणि या चित्रपटाला सात केरळ राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाले.

आर. सरथ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात माहितीपटांपासून (documentaries) केली. त्यांच्या सुरुवातीच्या कामात कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर विशेष भर होता. 'द पेंटेड एपिक्स' (The Painted Epics) हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प होता.आर. सरथ यांच्या कामगिरीमध्ये दिग्दर्शकाच्या सर्वोत्तम पदार्पणासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' यांचा समावेश होता. त्यांना मल्याळम भाषेतील सर्वोत्तम फीचर फिल्मसाठी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार'ही मिळाला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार जिंकले.

आर. सरथ यांनी 'भूमिक्कोरू चरमगीथम' (Bhoomikkoru Charamageetham) या लघुपटाचेही दिग्दर्शन केले. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. तसेच, त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रांत प्रशिक्षणही घेतले होते. दरम्यान, आर. सरथ यांचा दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'स्वयम: सेल्फलेस' (Swayam: Selfless) हा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT