OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Shruti Vilas Kadam

चुंबक’ (Chumbak)

OTT: Netflix
मुंबईतील पारंपरिक चाळीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘चुंबक’मध्ये पाच कुटुंबांची कथा पाहायला मिळते. पालकत्व, नाती, वाढतं वय आणि दैनंदिन संघर्षांमधून या कुटुंबांमध्ये आपुलकीचे नवे बंध निर्माण होतात. विनोद आणि भावनिक प्रसंगांनी रंगलेला हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

OTT Releases

बंदर (Bandar)

OTT: ZEE5
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ हा चित्रपट आज OTT वर प्रदर्शित झाला आहे. समर मेहरावर बलात्काराचा खोटा आरोप होतो आणि त्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलते, याची कथा यात पाहायला मिळते. IMDb वर चित्रपटाला ७.२ रेटिंग आहे.

OTT Releases

अल्फा (Alpha)

OTT: Netflix
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अल्फा’ हा हेरगिरीवर आधारित थ्रिलर आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

OTT Releases

आय, नोबडी (I, Nobody)

OTT: Jio Hotstar
मल्याळम भाषेतील हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. २ तास ४८ मिनिटांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन निसम बशीर यांनी केले आहे. बँक दरोड्याचा आरोप असलेल्या व्यक्तीभोवती कथा फिरते.

OTT Releases

बबिता सिंग रिपोर्टिंग (Babita Singh Reporting)

OTT: Prime Video
हा क्राईम थ्रिलर चित्रपट बबिता नावाच्या पोलीस महिलेभोवती फिरतो. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी गेल्यानंतर तिच्या मैत्रिणीची हत्या होते. या हत्येचे गूढ बबिता उकलू शकेल का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

OTT Releases

बॅकरूम्स (Backrooms)

OTT: SonyLIV
२०२६ मध्ये प्रदर्शित झालेला हा साय-फाय हॉरर चित्रपट आहे. एका थेरपिस्टचा रुग्ण अचानक गायब होतो आणि त्यानंतर थेरपिस्टसमोर स्वतःचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहते. IMDb वर ६.८ रेटिंग आहे.

OTT Releases

दे विल किल यू (They Will Kill You)

OTT: Jio Hotstar
हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट असून त्याचा कालावधी १ तास ३४ मिनिटे आहे. IMDb वर या चित्रपटाला ६.३ रेटिंग मिळाले आहे. ॲक्शनसोबत कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे.

OTT Releases

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

School Admission Age | Saam Tv
येथे क्लिक करा