School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

Shruti Vilas Kadam

साधारण ३ वर्षांच्या आसपास प्री-स्कूल सुरू करता येते

बालरोगतज्ज्ञांच्या मते, सुमारे ३ वर्षांच्या वयात मुलाला खेळावर आधारित प्री-स्कूलमध्ये पाठवता येते. येथे शिकवण्यापेक्षा खेळ आणि विविध उपक्रमांमधून शिकण्यावर भर असतो.

School Admission

दोन वर्षांच्या मुलांवर अभ्यासाचा दबाव नको

मुलं दोन वर्षांची झाली म्हणून लगेच शाळेत पाठवण्याची घाई करू नये. या वयात खेळणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि आजूबाजूच्या गोष्टींमधून शिकणे महत्त्वाचे आहे.

School Admission | Canva

प्री-स्कूल आणि पहिली इयत्ता वेगळी आहे

NEP 2020 नुसार मुलांची फाउंडेशनल स्टेज ३ ते ८ वर्षांपर्यंत असते. यात सुरुवातीची तीन वर्षे प्री-स्कूलची असून त्यानंतर पहिली आणि दुसरी इयत्ता येते.

School Admission | Canva

पहिली इयत्ता साधारण ६ वर्षांच्या आसपास

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या प्री-स्कूल किंवा फाउंडेशनल शिक्षणानंतर मूल साधारण ६ वर्षांचे झाल्यावर पहिली इयत्ता सुरू करू शकते.

School Admission | Canva

मुलाची मानसिक तयारीही महत्त्वाची

केवळ वय पाहून मुलाला शाळेत पाठवणे योग्य नाही. मूल पालकांपासून काही काळ वेगळे राहू शकते आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास तयार आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.

School Admission

स्वतःच्या गरजा सांगता येणे गरजेचे

मुलाला भूक, तहान किंवा इतर गरजा सांगता येणे, इतर मुलांसोबत खेळणे-बोलणे आणि खाणे-टॉयलेटसारख्या छोट्या गोष्टी स्वतः करण्याचा प्रयत्न करता येणे ही शाळेसाठी तयारीची चिन्हे आहेत.

School Admission

इतर मुलांशी तुलना करू नका

शेजारचे किंवा ओळखीचे मूल दोन-तीन वर्षांचे असताना शाळेत गेले म्हणून आपल्या मुलालाही त्याच वयात पाठवण्याची गरज नाही. प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेग वेगळा असतो.

School Admission | Canva

Elaichi Banana Benefits: वेलची केळी की साधी केळी? आरोग्यासाठी कोणतं अधिक फायदेशीर, जाणून घ्या

Elaichi Banana Benefits | एोोस ऊन
येथे क्लिक करा