Shruti Vilas Kadam
वेलची केळी साध्या केळ्यापेक्षा आकाराने लहान असतात. त्यांची साल हलकी पिवळी किंवा किंचित हिरवट असते आणि चव अधिक गोड व सुगंधी असते.
वेलची केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय मॅग्नेशियम, लोह आणि झिंकसारखी खनिजेही आढळतात.
नेहमीच्या केळ्यामध्येही पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन C आणि विविध खनिजे असतात. त्यामुळे रोजच्या आहारात साधं केळंही चांगला पर्याय ठरू शकतं.
केळ्यातील पोटॅशियम शरीरासाठी महत्त्वाचे पोषक तत्त्व आहे. साध्या केळ्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाबाच्या सामान्य नियंत्रणासाठी आवश्यक पोटॅशियम मिळण्यास मदत होते.
दोन्ही प्रकारच्या केळ्यांमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.
वेलची केळं खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी ते आहारातील एक पर्याय ठरू शकते. मात्र, वजन कमी करण्यासाठी केवळ केळ्यावर अवलंबून राहू नये.
दोन्ही प्रकारची केळी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. उपलब्ध माहितीनुसार वेलची केळं पोषक घटकांच्या दृष्टीने थोडं अधिक पौष्टिक मानलं जातं; तरीही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार दोन्हींचा आहारात समावेश करता येतो.