Shruti Vilas Kadam
सकाळी वॉक केल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात उत्साहाने आणि ॲक्टिव्हनेसने करता येते.
सकाळच्या चालण्यामुळे दिवसभर मूड चांगला राहण्यास आणि शरीरात ऊर्जा जाणवण्यास मदत होऊ शकते.
दिवसभराच्या कामामुळे आलेला थकवा आणि तणाव कमी करण्यासाठी संध्याकाळी चालणे फायदेशीर ठरू शकते.
रात्रीच्या जेवणानंतर हलका वॉक करणे हा व्यायामाचा सहज पर्याय ठरू शकतो.
जेवणानंतर चालल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळू शकते. मात्र, जेवणानंतर लगेच वेगाने चालण्याऐवजी हलके चालणे योग्य.
उन्हाळ्यात कडक ऊन टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चालणे अधिक सोयीचे ठरते.
चालण्याचा फायदा फक्त सकाळी किंवा संध्याकाळी चालण्यावर अवलंबून नसतो. तुम्हाला जी वेळ दररोज सहज पाळता येईल, तीच सर्वोत्तम वेळ आहे.