Actor Hit and Run Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Hit and Run Case: प्रसिद्ध अभिनेत्याच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं, अपघातानंतर गेला पळून; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Actor Hit and Run Case: मलयाळम अभिनेता मणियंपिल्ला राजू हिट-ऍन्ड-रन प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्या कारच्या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Hit and Run Case: मल्याळम अभिनेता मणियंपिल्ला राजू यांची गाडी काल रात्री तिरुवनंतपुरममधील त्रिवेंद्रम क्लबमधून बाहेर येत असताना एका बाईकला धडकली. अपघातानंतर ते गाडी न थांबवता निघून गेले. दुचाकीवरील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना 5 फेब्रुवारी रात्री सुमारे 9.30 वाजता त्रिवेंद्रम क्लब जवळील व्हाझुथककाड रोडवर घडली. सुरज आणि निदेव असे जखमी तरुणांची नाव असून असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. धडक झाल्यानंतर कार चालक अभिनेता तेथून सोडून निघून गेला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी त्यानुसार FIR नोंदवली असून कारच्या रजिस्ट्रेशन नंबरमुळे वाहन अभिनेता मणियानपिला राजू याच नावावर आहे हे निश्चित झाले. सुरुवातीच्या चौकशीत असं लक्षात आलं की कार रॉयल इनफिल्ड मोटरसायकलला जोरदारपणे आदळली आणि चालकाने पुढे न थांबता पुढे निघून गेला.

शुक्रवारी सकाळी ७० वर्षीय अभिनेता राजू म्यूझियम पोलिस स्टेशन येथे उपस्थित झाले व त्यांची अटक नोंदवण्यात आली. पोलिसांनी सांगितले की राजू यांना आधी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं, ज्यामध्ये त्यांच्या रक्तातील अल्कोहोलच्या स्तराची तपासणीही करायची आहे. मणियंपिल्ला राजू यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १२५(अ) ​​आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ (अ) आणि १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलीस ठाण्यातच जामिनावर सोडण्यात आले.

मणियानपिला राजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, अचानक झालेल्या धडकेतून घाबरून ते जागेवर थांबले नाहीत, तसेच ते त्या रात्री एका कार्यक्रमातून घरी परतत असताना हा अपघात झाला, असे त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांनी पुढे सांगितले की ते त्यावेळी आजारी होते आणि त्यांच्या पत्नीही घरी एकटी होत्या, म्हणून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, जखमी तरुणांच्या नातेवाईकांनीही राजू यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, कार चालवणाऱ्याने लगेचच गाडी थांबवून जखमी लोकांची मदत करायला हवी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत

GK: भारतातील उलट दिशेने वाहणारी एकमेव नदी कोणती? तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड

Cyber Crime News : शेअर ट्रेंडिगमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष, पुण्यातील तिघांची सव्वा कोटींची फसवणूक

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादीत ३७ मतांचा मोठा पेच | VIDEO

SCROLL FOR NEXT