Nepal tourism: हिमालयाच्या कुशीतला स्वर्ग! नेपाळमधील ही ठिकाणं तुमच्यासाठी ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

नेपाळ

नेपाळ हा हिमालयाच्या कुशीत वसलेला सुंदर देश आहे. नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन मंदिरं आणि साहसी पर्यटन यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. शांत वातावरण, पर्वतरांगा आणि विविध परंपरा यामुळे नेपाळ पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो.

Nepal tourism

लहान देश

नेपाळ हा दक्षिण आशियातील एक लहान पण अतिशय सुंदर देश आहे जो हिमालय पर्वतरांगांनी वेढलेला आहे. याठिकाणी विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचा संगम पाहायला मिळतो. याठिकाणी पर्यटनाची कोणती ठिकाणं आहे ते पाहूयात.

places to visit in Nepal

काठमांडू

काठमांडू हे नेपाळमधील सर्वात प्रसिद्ध शहर आहे जिथे अनेक प्राचीन मंदिरं आणि राजवाडे आहेत. याठिकाणची संस्कृती, इतिहास आणि धार्मिक श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवता येतो.

Kathmandu tourism

पोखरा

पोखरा हे नेपाळमधील एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे शांत तलाव आणि डोंगररांगा आहेत. पेवा लेकमध्ये बोटिंगचा आनंद घेता येतो आणि पर्वतरांगांचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळतं. तसंच तुम्ही याठिकाणी पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगही करू शकता.

Pokhara travel

लुंबिनी

लुंबिनी हे बौद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे आणि जगभरातून भाविक याठिकाणी येतात. गौमत बुद्ध यांचा जन्म येथे झाला असल्यामुळे या ठिकाणाला जागतिक महत्त्व आहे.

Lumbini Buddhist site

भारतातून नेपाळला कसं जायचं?

भारतामधून नेपाळला जाण्यासाठी विमान, ट्रेन आणि रोड या तीनही मार्गांचा उपयोग करता येतो. मुंबई किंवा दिल्लीतून काठमांडूसाठी थेट फ्लाइट उपलब्ध असून साधारण 8,000 ते 15,000 रुपये खर्च येतो. रोडने किंवा ट्रेनने गेल्यास खर्च कमी होऊन साधारण 3,000 ते 7,000 रुपयांत प्रवास पूर्ण होऊ शकतो.

Chitwan National Park

चितवन नॅशनल पार्क

चितवन नॅशनल पार्क हे नेपाळमधील प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे. याठिकाणी एकशिंगी गेंडा, वाघ आणि विविध पक्षी प्रजाती पाहायला मिळतात. जंगल सफारी आणि नैसर्गिक जीवनाचा जवळून अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे.

Nepal travel from India

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा