Ekda Yeun Tar Bagha Star Cast Instagram
मनोरंजन बातम्या

Ekda Yeun Tar Bagha Star Cast: फुल्ल टू एंटरटेनमेंट, ‘एकदा येऊन तर बघा’मध्ये पाहायला मिळणार हास्यजत्रा; ओंकार भोजने दिसणार प्रमुख भुमिकेत

Marathi Movie: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ ची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतेय.

Chetan Bodke

Ekda Yeun Tar Bagha Star Cast

कुटुंब म्हटलं की, रुसवे- फुगवे, एकमेकांची साथ आणि अनेक गोष्टी येतात. अशा कुटुंबाची जर आपल्याला साथ मिळाली तर, आपण नक्कीच यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करतो. सध्या अशाच एका कुटुंबाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ ची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतेय. हे फुलंब्रीकर कुटुंबीय येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Marathi Actors)

चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती फिरतेय. त्या कुटुंबामध्ये तीन भाऊ असतात. श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची गोष्ट म्हणजेच चित्रपटाची कथा आहे. हे फुलंब्रीकर कुटुंबीयांचा हॉटेल व्यवसाय आहे. आपल्या हॉटेलामध्ये ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात?

ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात ? आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’. (Marathi Actress)

चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. सोबतच सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, राजेंद्र शिसातकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची फौज चित्रपटात आहे. (Marathi Film)

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा अभिनेता प्रसाद खांडेकरने लिहिली असून या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात प्रसाद खांडेकर पदार्पण करीत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT